RBI ची गिफ्ट! रेपो रेटमध्ये झाली कपात, आता EMI होईल 'इतका' कमी

RBI ची गिफ्ट! रेपो रेटमध्ये झाली कपात, आता EMI होईल 'इतका' कमी

RBI, Repo rate - RBIनं रेपो रेट कमी केलाय. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : देशाची सेंट्रल बँक RBI नं सर्वसामान्यांसाठी एक मोठी गिफ्ट दिलीय. RBI नं रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केलीय.रेपो रेट 0.35 टक्के कमी होऊन 5.40 टक्क्यांवर आलाय. RBIनं लागोपाठ चौथ्यांदा व्याजदरात कपात केलीय. गेल्या तीन बैठकीत MPC रेपो रेटमध्ये कपात केलीय. आरबीआयनं आर्थिक वर्ष 2019साठी जीडीपी ग्रोथ लक्ष्यही कमी केलंय.

व्याजदर कमी करणं म्हणजे बँका जेव्हा RBI कडून फंड घेतील तेव्हा त्यांना नव्या दरानं फंड मिळेल. स्वस्त दरात बँकांना मिळणाऱ्या फंडाचा फायदा बँक ग्राहकांना देते. यामुळे गृहकर्ज स्वस्त होतात आणि ईएमआयही कमी होतो. म्हणूनच रेपो रेट कमी झाल्यानं कर्ज घेणं स्वस्त होतं. पर्यायानं ईएमआय कमी होते.

RIL आणि BP मध्ये नवा करार, 5 वर्षात उघडणार 5,500 पेट्रोल पंप

का कमी झाले व्याज दर?

RBI नं महागाईत थोडी नरमी बघून पाॅलिसी रेट्समध्ये 0.35 टक्के कपात केलीय. त्यानंतर रेपो रेट 5.40 टक्के झाला. असं झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी बँकेकडून कर्ज घेणं स्वस्त होईल आणि EMI कमी होईल.

आर्थिक वर्ष 2020मध्ये जीडीपी 7.4 टक्के असण्याचा अंदाज

रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2020च्या पहिल्या तिमाहीत 7.4 टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवलाय. RBI नं2020साठी GDP वाढीचं लक्ष्य 7 टक्के कमी करून 6.9 टक्के केलंय. RBI प्रमाणे 2020च्या पहिल्या सहा महिन्यात 5.8-6.6 टक्के वाढीचा अंदाज आहे. दुसऱ्या सहा महिन्यात 7.3 - 7.5 टक्के वाढीचा अंदाज आहे. या दरम्यान रिटेल महागाईचा अंदाज 3.6 टक्के आहे. ऑक्टोबर ते मार्च तिमाहीत रिटेल महागाई 3.5-3.7 टक्के असू शकते.

सुषमा स्वराज यांच्याकडे होती 32 कोटींची संपत्ती, आता कोण असणार वारसदार?

रेपो रेट म्हणजे काय?

दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात.

LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, रोज 22 रुपये खर्च करून मिळतील हे 4 फायदे

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

बरेचदा दिवसभर व्यवहार करूनही बँकांकडे मोठी रक्कम शिल्लक राहते. ही रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

वास्तविक पाहता रिव्हर्स रेपो रेट हा बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचं काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिक्विडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँका रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वत:च्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.

तुझ्यात जीव रंगला फेम राणादा आणि पाठकबाई अडकले पुरात; पाहा EXCUSIVE VIDEO

First published: August 7, 2019, 1:19 PM IST
Tags: rbi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading