मराठी बातम्या /बातम्या /मनी /लॉकरबाबतीत बँकांसाठी आता नवीन नियम, RBI ने जारी केल्या गाइडलाइन्स

लॉकरबाबतीत बँकांसाठी आता नवीन नियम, RBI ने जारी केल्या गाइडलाइन्स

बँक लॉकरसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी काही दिशानिर्देश जारी केली आहे. हे नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत.

बँक लॉकरसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी काही दिशानिर्देश जारी केली आहे. हे नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत.

बँक लॉकरसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी काही दिशानिर्देश जारी केली आहे. हे नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत.

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट: बँकांच्या विविध सेवांमध्ये बँक लॉकर (Bank Locker) ही देखील एक महत्त्वाची सुविधा आहे. तुम्ही देखील बँक लॉकरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पुढील वर्षापासून बँक लॉकर संदर्भात नियमात बदल होणार आहे.

बँक लॉकरसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India New Guidelines on Bank Locker) बुधवारी काही दिशानिर्देश जारी केली आहे. हे नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत. जाणून घ्या सविस्तर

आरबीआयने बुधवारी बँकांना लॉकर वाटपात पारदर्शकता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन नियमानुसार, शाखानिहाय लॉकर वाटपाची माहिती आणि प्रतीक्षा यादी कोअर बँकिंग प्रणालीशी जोडली जाईल. दिशानिर्देशांमध्ये असं म्हटलं आहे की लॉकर वाटपाच्या सर्व अर्जांसाठी बँकांना पावती द्यावी लागेल. जर लॉकर वाटपासाठी उपलब्ध नसतील तर बँकांना ग्राहकांना प्रतीक्षा यादी क्रमांक द्यावा लागेल.

नवीन दिशानिर्देशांनुसार, बँकेचे सध्याचे ग्राहक ज्यांनी लॉकर सुविधेसाठी अर्ज केला आहे आणि जे सीडीडी (Customer Due Diligence) मानकांचे पूर्णपणे पालन करत आहेत, त्यांना सुरक्षित डिपॉझिट लॉकर/सेफ कस्टडी आर्टिकलची सुविधा नियमानुसार दिली जाऊ शकते. नवीन नियमानुसार, सेफ डिपॉझिट लॉकर/सेफ कस्टडी आर्टिकलची सुविधा अशा ग्राहकांना दिली जाऊ शकते ज्यांचे बँकेशी इतर कोणतेही बँकिंग संबंध नाहीत.

हे वाचा-भंगार विकून केली 391 कोटींची कमाई, Indian Railway ची कोरोना काळात झाली चांदी!

काही वेळा ग्राहकांकडून बँक लॉकरमध्ये चुकीच्या गोष्टी ठेवल्या जातात. हे टाळण्यासाठी आरबीआयने लॉकर संदर्भातील करारत एक महत्त्वाचे कलम समाविष्ट केले आहे. ते असे की ग्राहकांना लॉकरमध्ये काहीही बेकायदेशीर किंवा कोणताही धोकादायक पदार्थ ठेवता येणार नाही. जर बँकेला कोणत्याही ग्राहकाद्वारे सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये कोणत्याही बेकायदेशीर किंवा धोकादायक पदार्थाच्या ठेवीचा संशय आला, तर अशा ग्राहकावर योग्य कारवाई करण्याचा अधिकार बँकेला असेल.

हे वाचा-Gold Price Today: दोन दिवसांच्या तेजीनंतर उतरले सोन्याचे दर, चांदीची झळाळी उतरली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमाअंतर्गत, आग, चोरी, इमारत कोसळणे किंवा बँक कर्मचाऱ्यांकडून फसवणूक झाल्यास बँकांचे दायित्व त्याच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट मर्यादित असेल. जर ग्राहकाने सलग तीन वर्षे भाडे भरले नाही तर बँक योग्य प्रक्रियेनंतर कोणताही लॉकर उघडू शकते, असेही या नव्या नियमात नमूद करण्यात आले आहे.

First published:

Tags: Money, Rbi, Rbi latest news