मराठी बातम्या /बातम्या /मनी /

RBI चा मोठा निर्णय, मोदी सरकारच्या खजिन्यात पडणार भर

RBI चा मोठा निर्णय, मोदी सरकारच्या खजिन्यात पडणार भर

भारतीय रिझर्व्ह बँके (RBI)नं एक मोठा निर्णय घेतला आहे. RBIच्या सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भारतीय रिझर्व्ह बँके (RBI)नं एक मोठा निर्णय घेतला आहे. RBIच्या सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भारतीय रिझर्व्ह बँके (RBI)नं एक मोठा निर्णय घेतला आहे. RBIच्या सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 21 मे: भारतीय रिझर्व्ह बँके (RBI)नं एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आरबीआय (The Reserve Bank of India) केंद्र सरकार (Central Government) ला 99 हजार 122 कोटी देणार आहे. आरबीआयच्या बोर्डानं 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या 9 महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी केंद्र सरकारला 99, 122 कोटी रुपयांचा सरप्लस निधी देण्यास मंजूरी दिली आहे. RBIच्या सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आज आरबीआय सेंट्रल बोर्ड(RBI Central Board)ची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय झाला. जुलै 2020 पासून ते मार्च 2021 पर्यंतची ही सरप्लस रक्कम केंद्र सरकारकडे जमा करण्यात येणार आहे.

एका निवेदनानुसार, आरबीआयनं बोर्डानं कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर प्रार्दुभाव कमी करण्यासाठी सद्य आर्थिक परिस्थिती, जागतिक आणि देशांतर्गत आव्हानं तसंच धोरणात्मक उपायांचा आढावा घेतला.

हेही वाचा- 31 मेपर्यंत गोवा बंद! Coronavirus नियंत्रणासाठी कर्फ्यूत वाढ

काय झाले बैठकीत?

रिझर्व्ह बँकेनं लेखा वर्ष (Accounting year)एप्रिल- मार्च तसंच 9 महिन्यांच्या (जुलै 2020- मार्च 2021) कालावधीतील आरबीआयच्या कामकाजाविषयी बोर्डानं चर्चा केली. या बैठकीदरम्यान गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली बोर्डानं संक्रमणाच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल आणि खाती मंजूर केली. तसंच केंद्र सरकारला सरप्लस निधीच्या रुपात 99,122 कोटी रुपये देण्यासही मंजूरी दिली.

First published:

Tags: Central government, Rbi, Rbi latest news