मराठी बातम्या /बातम्या /मनी /

RBIचे आर्थिक वर्ष बदलण्याची शक्यता, बोर्डाने केंद्राकडे केली शिफारस

RBIचे आर्थिक वर्ष बदलण्याची शक्यता, बोर्डाने केंद्राकडे केली शिफारस

केंद्र सरकारचं आर्थिक वर्ष 1  एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत असतं. तर RBI चं आर्थिक वर्ष 1 जुलैपासून सुरू होऊन 30 जूनपर्यंत संपतं. दरम्यान RBI बोर्डाकडून अशी मागणी करण्यात आली आहे की, RBIचं आर्थिक वर्षसुद्धा 1 एप्रिलपासून सुरू करण्यात यावं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : भारतीय रिजर्व्ह बँक (RBI) आणि केंद्र सरकारचं (Central Government) आर्थिक वर्ष (Financial Year) एकच होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचं आर्थिक वर्ष 1  एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत असतं. तर RBI चं आर्थिक वर्ष 1 जुलैपासून सुरू होऊन 30 जूनपर्यंत संपतं. दरम्यान RBI बोर्डाकडून अशी मागणी करण्यात आली आहे की, RBIचं आर्थिक वर्षसुद्धा 1 एप्रिलपासून सुरू करण्यात यावं. तसा प्रस्ताव त्यांनी केंद्राकडे पाठवला आहे. मीडिया रिपोर्टप्रमाणे RBI च्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हा बदल 2020-21च्या आर्थिक वर्षापासून लागू होऊ शकतो. त्याचप्रमाणे विमल जालान समितीने सुद्धा RBI चे आर्थिक वर्ष सरकारच्या आर्थिक वर्षाबरोबरच करण्याची शिफारस केली होती. (हेही वाचा- नव्या कर प्रणालीत काय आहे TAX FREE? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर) दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं की बोर्डाच्या या शिफारसीबाबत विचार करण्यात येईल. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल. RBI च्या  सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने आपल्या 582व्या बैठकीत आर्थिक परिस्थिती, जागतिक त्याचप्रमाणे देशांतर्गत समस्या यांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर, वित्त सचिव राजीव कुमार यांच्याबरोबरच अन्य ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा-आयकर विभागाच्या ‘या’ इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं PAN होणार रद्द!) बोर्डाच्या या बैठकीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यानी बोर्डाच्या संचालकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 आणि केंद्राकडून लक्षकेंद्रित करण्यात येणाऱ्या आर्थिक बाबींवर आपले विचार मांडले. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर आर्थिक वर्षाबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येण्याची शक्यता आहे.
First published:

पुढील बातम्या