Home /News /money /

Petrol-Diesel Prices Today: पाहा प्रजासत्ताक दिनी काय आहे तुमच्या शहारातील आजचा पेट्रोल-डिझेल दर

Petrol-Diesel Prices Today: पाहा प्रजासत्ताक दिनी काय आहे तुमच्या शहारातील आजचा पेट्रोल-डिझेल दर

सध्या नोव्हेंबर महिन्यापासून दर वाढले नसले, तरी अद्यापही पेट्रोल भाव 100 रुपयांवर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा इंधनासाठी मोठी रक्कम द्यावी लागत आहे.

    नवी दिल्ली, 26 जानेवारी : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीदरम्यान आयओसीएलने (IOCL) आज बुधवारी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today, 26 January 2022) जारी केले. त्यानुसार आजही इंधन दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. इंधन दरात 4 नोव्हेंबर 2021 पासून कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपयांची आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये प्रति लीटरची कपात केली होती. त्यामुळे अनेक शहरांत पेट्रोल भाव काहीसा कमी झाला. सध्या नोव्हेंबर महिन्यापासून दर वाढले नसले, तरी अद्यापही पेट्रोल भाव 100 रुपयांवर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा इंधनासाठी मोठी रक्कम द्यावी लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) सतत चढ-उतार होत आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज बुधवारी पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

    हे वाचा - 'या' स्टॉकमुळे वर्षभरात 340 टक्के नफा; तज्ज्ञांच्या मते अजूनही कमाईची संधी

    राज्यातील आजचा पेट्रोल-डिझेल भाव -
    शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे109.45 रुपये92.25 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
    नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
    अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
    औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
    रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
    रायगड109.48 रुपये92.25 रुपये
    परभणी112.49 रुपये95.17 रुपये
    पालघर109.75 रुपये92.51 रुपये
    सांगली110.03 रुपये92.83 रुपये
    कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये
    असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या