टर्म लाइफ इन्शुरन्स हवा असेल तर लसीकरण अनिवार्य, विमा कंपन्यांचा निर्णय- अहवाल

टर्म लाइफ इन्शुरन्स हवा असेल तर लसीकरण अनिवार्य, विमा कंपन्यांचा निर्णय- अहवाल

कोरोना काळात ऐनवेळी आर्थिक आधार मिळावा यासाठी अनेकजण विम्याकडे (Policy) वळताना दिसत आहेत. मात्र काही विमा कंपन्यांनी आता कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) झाले असेल तरच टर्म विमा पॉलिसी (Term Policy) दिली जाईल अशी भूमिका घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून: देशात कोरोनाच्या (Coronavirus in India) दुसऱ्या लाटेनं कहर केला. या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली. परिणामी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स आणि औषधांचा मोठा तुटवडा जाणवला. या स्थितीमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा कमी होताना दिसत आहे. दरम्यान, सरकारने लसीकरणावर (Vaccination Drive in India) अधिक भर दिला आहे. परंतु, नियोजनाचा अभाव, लसींचा अपुरा पुरवठा आदी कारणांमुळे लसीकरण मोहिमेत अडथळा येत आहे. अशा स्थितीतही सरकार आणि नागरिक लसीकरणाला प्राधान्य देत आहेत.

दरम्यान कोरोना तसेच अन्य आजारांमुळे निर्माण झालेल्या स्थितीत अनेकांना उपचारांसाठी मोठा खर्च आला. मीडिया अहवालानुसार या पार्श्वभूमीवर मॅक्स लाइफ आणि टाटा एआयए या कंपन्यांनी असा निर्णय जाहीर देखील केला आहे.

मॅक्स लाइफ (Max Life) आणि टाटा एआयए (Tata AIA) टर्म लाइफ इन्शुरन्स खरेदी करणाऱ्यांना काही जागतिक विमा कंपन्यांच्या समान नियमांनुसार कोविड -19 प्रतिबंधक लस (Covid-19 Vaccination) घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हे वाचा-राज्यात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण, दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 50 लाखांवर

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, मॅक्स लाइफ 45 वर्षांवरील व्यक्तींना कोविड-19 प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना टर्म लाइफ इन्शुरन्स (Term Life Insurance) देणार आहे. टाटा एआए सर्व वयोगटातील ज्या व्यक्तींनी कोविड -19 प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतला आहे, त्यांनाच पॉलिसी प्रदान करीत आहे.

मीडिया अहवालात टाटा एआयएच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने असे म्हटलं आहे की, या प्रकक्त्याने असे सांगितले की आमच्या पॉलिसी धारकांना सर्वोच्च पातळीवर आर्थिक संरक्षण मिळावे, असा आमचा प्रयत्न असतो आणि आम्ही त्यांच्या हिताचे संरक्षण करण्याची खात्री देखील देतो. आमची कार्यपध्दती आणि धोरणं ही वास्तविकता दर्शवतात. आमची कार्यपध्दती ग्राहक केंद्रीत आणि दूरदर्शी आहे. याबाबत मॅक्स लाईफकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. या पॉलिसीचा अर्थ असा आहे की ज्यांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. त्यांना टर्म लाईफ इन्शुरन्स घेता येणार नाही.

हे वाचा-Covid-19 Vaccine: मुंबई पालिका घेणार 'त्या' 50 हजार मुंबईकरांचा शोध

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health Ministry) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, केवळ 18.95 कोटी नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर 4.66 कोटी नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मॅक्स लाईफच्या प्रवक्त्याने सांगितले की कंपनी कोरोना प्रतिबंधक लस न मिळालेल्या नागरिकांसाठी नवीन टर्म लाईफ पॉलिसी जारी करणार आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 11, 2021, 1:56 PM IST

ताज्या बातम्या