मराठी बातम्या /बातम्या /मनी /जाणून घ्या, Credit Cardचे बिलिंग सायकल कसे असते?

जाणून घ्या, Credit Cardचे बिलिंग सायकल कसे असते?

Digital Payment

Digital Payment

भारतात गेल्या काही वर्षांपासून डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) ट्रेंड झपाट्यानं वाढत आहे.

   नवी दिल्ली,6 डिसेंबर: भारतात गेल्या काही वर्षांपासून डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) ट्रेंड झपाट्यानं वाढत आहे. कोरोना महामारीच्या काळात तर याला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळं देशातलd/e सर्व लहान-मोठ्या शहरांमध्ये क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर वाढला आहे. एका अहवालानुसार, भारतात सध्या सुमारे 6.4 कोटी क्रेडिट कार्ड्स वापरात आहेत. तुम्हीदेखील क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. क्रेडिट कार्डचं बिलिंग सायकल (Billing Cycle) ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स असतील तर बिलिंग सायकलकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे.

  क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल म्हणजे काय?

  क्रेडिट कार्ड बिलिंग सायकलला 'स्टेटमेंट सायकल' म्हणूनही ओळखलं जातं. क्रेडिट कार्ड सक्रिय झाल्याच्या दिवसापासून बिलिंग सायकल सुरू होतं. बिलिंग सायकलचा कालावधी 28 ते 32 दिवसांपर्यंत असू शकतो. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (Credit card statement) किंवा बिलिंग स्टेटमेंटच्या माध्यमातून एका बिलिंग सायकलमध्ये कार्डचा कसा वापर झाला याची माहिती मिळते. स्टेटमेंटमध्ये बिलिंग सायकलदरम्यान केलेले सर्व व्यवहार, किमान देय रक्कम, एकूण देय रक्कम, देय तारीख इत्यादींची माहिती असते.

  पेमेंट ड्यू डेट

  पेमेंट ड्यू डेट (Payment due date) ही क्रेडिट कार्ड बिल भरण्याची शेवटची तारीख असते. या तारखेनंतर केलेल्या पेमेंटवर दोन प्रकारे शुल्क आकारलं जातं. एक तर तुम्हाला थकीत रकमेवर व्याज द्यावं लागतं आणि लेट पेमेंट फीदेखील भरावी लागते.

  मिनिमम अमाउंट ड्यू

  एकूण बिल भरण्याची जी रक्कम बाकी असेल त्याच्या साधारणपणे 5 टक्के रक्कम मिनिमम अमाउंट ड्यू असते. तुम्हाला बिल त्या महिन्यात भरणं शक्य नसेल, तर मिनिमम अमाउंट ड्यू रक्कम भरली तर दंड होत नाही. उर्वरितर रकमेवर मात्र बँक व्याज आकारते.

  टोटल आउटस्टँडिंग

  कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तुम्ही दरमहा एकूण थकबाकी भरली पाहिजे. एकूण रकमेत बिलिंग सायकलदरम्यान लागणाऱ्या शुल्कांसह सर्व ईएमआय (EMI) समाविष्ट असतात.

  क्रेडिट लिमिट (Credit Limit)

  क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये, एकूण क्रेडिट लिमिट, उपलब्ध क्रेडिट लिमिट आणि कॅश लिमिट अशा तीन प्रकारच्या मर्यादांची माहिती दिलेली असते.

  ट्रान्झॅक्शन डिटेल्स

  तुमच्या क्रेडिट कार्ड खात्यात किती पैसे आले आणि किती खर्च झाले याची संपूर्ण माहिती या सेक्शनमध्ये असते.

  रिवॉर्ड पॉइंट्स

  क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये तुम्हाला आतापर्यंत जमा झालेल्या रिवॉर्ड पॉइंट्सचं (Reward Point) स्टेटसही दिसतं. मागील सायकलमधून कमावलेल्या रिवॉर्ड पॉइंट्सची संख्या, सध्याच्या बिलिंग सायकलमध्ये मिळवलेले पॉइंट्स आणि कालबाह्य झालेले किंवा होणार असलेले पॉइंट्स दर्शविणारा तक्ता या सेक्शनमध्ये दिसतो.

  तुम्ही नियमितपणे क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर वरील सर्व गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवत राहा.

  First published:

  Tags: Credit card, Online payments