मुंबई, 22 नोव्हेंबर : टर्म इन्शुरन्स ( Term insurance ) हा एक प्रमुख विमा प्रकार आहे. कमी रकमेच्या हप्त्याच्या (Low premium ) बदल्यात भरघोस विमाकवच ( sum insured ) हे या विम्याचे वैशिष्ट्य आहे. या इन्शुरन्समधून अन्य पॉलिसींप्रमाणे मनी बॅक (Money back), एण्डोव्हमेंट ( endowment ) आदी आर्थिक परतावा मिळत नसल्याने या विम्याकडे अनेक जण पाठ फिरवतात. परंतु या विम्याकडे गुंतवणुकीचे नव्हे तर कौटुंबिक सुरक्षेचे ( family security) साधन म्हणून बघितले गेल्यास या विम्याचं महत्त्व पटतं. स्वतःच्या कौटुंबिक सुरक्षेचा विचार करून टर्म इन्शुरन्स प्लॅन घेत असला तर हा इन्शुरन्स घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टीव्ही 9 हिंदीने याबाबत वृत्त दिलं आहे.
टर्म इन्शुरन्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य (Financial Stability) मिळवून देता. हा एक असा विमा आहे जो तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाला आर्थिक आधार देतो. जेव्हा तुम्ही गुंतवणुकीचा प्लॅन करीत असता, तेव्हा आर्थिकतज्ज्ञ नेहमी टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याचा सल्ला देतात. त्यानंतरच गुंतवणुकीच्या इतर पर्यांयाचा विचार करा, असे सांगतात.
पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास टर्म लाइफ इन्शुरन्स कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या मजबूत ठेवतो. ही विमा पॉलिसी अगदी सोपी आहे, तसेच किफायतशीर आहे. मात्र, टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला किती पैशांची गरज असते, जेणेकरून पुढील आयुष्य सहजतेने पार पडेल, मुलांचं शिक्षण व लग्न करता येईल, यासारख्या इतर बाबीही लक्षात घेणं आवश्यक आहे. टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे ते जाणून घेऊया.
वार्षिक उत्पन्नाच्या किमान 8-10 पट विमाकवच
कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अनेकवेळा असे दिसून येते की, त्याने टर्म इन्शुरन्स काढताना विमाकवच हे खूपच कमी घेतले होते. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर देखील त्याच्या कुटुंबासमोर आर्थिक संकटे कायम असतात. त्यामुळे टर्म इन्शुरन्स काढताना तुमच्या गरजा काय आहेत, त्या लक्षात घ्या. याशिवाय महागाईही लक्षात घ्या. आर्थिक तज्ज्ञांच्या मते टर्म इन्शुरन्स तुमच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा किमान 8-10 पट जास्त असावा. याशिवाय पॉलिसीची मुदत नेमकी किती असावी, याचाही विचार करणे गरजेचे आहे. जर तुमचे वय कमी असेल तर पॉलिसीची मुदत जास्त असावी. तुमचं वय जास्त असेल तर पॉलिसीची मुदत कमी असेल तरी चालेल.
PM Kisan अंतर्गत ₹2000 नाही तर मिळणार ₹4000? यासह मिळतील हे 3 मोठे फायदे
क्लेम सेटलमेंट रेशो तपासा
तुम्ही ज्या कंपनीकडून टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेत आहात, त्या कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो नक्की तपासा. ज्या कंपनीचा सेटलमेंट रेशो चांगला असेल, त्या कंपनीची पॉलिसी खरेदी करा. या प्रमाणामुळे तुम्हाला खात्री पटते की, तुमच्या कुटुंबाला टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळण्यास जास्त त्रास सहन करावा लागणार नाही.
स्वतःबद्दलची माहिती लपवू नका
तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करता, तेव्हा तुमच्याबद्दलची सर्व माहिती शेअर करा. पॉलिसीधारकाने गंभीर आजारासह महत्त्वाची माहिती लपवली असेल, तर क्लेम मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे हा इन्शुरन्स घेताना मेडिकल कंडिशन, कौटुंबिक मेडिकल हिस्ट्री, रिस्की लाइफ स्टाइल, धूम्रपान यासह इतर सर्व माहिती सांगा.
Business Idea : घरबसल्या सुरु करा 'हा' व्यवसाय, लाखोंच्या कमाईची संधी; सरकारकडून सबसिडीही मिळणार
लवकर घ्या पॉलिसी
टर्म इन्शुरन्ससह विविध प्रकारचे रायडर्स देखील दिले जातात. पण टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना, अनावश्यक रायडर्स खरेदी करणे टाळा. तुमच्या मृत्यूनंतर त्याला काही अर्थ राहत नाही. अनावश्यक रायडर्स खरेदी करणे टाळल्यास पॉलिसीचा प्रीमियम देखील जास्त होणार नाही. या सर्व बाबींचा विचार करून, लवकरात लवकर टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्या.
टर्म इन्शुरन्समधून अन्य आर्थिक परतावा मिळत नसल्याने यातून मिळणारे विमाकवच हे अन्य विमा पॉलिसींच्या तुलनेत कितीतरी अधिक असते. सद्यस्थितीत आघाडीच्या सर्व कंपन्यांकडून टर्म इन्शुरन्सची विक्री होते. स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर हा इन्शुरन्स खरेदी करणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Insurance, Investment, Money