मराठी बातम्या /बातम्या /मनी /Home Loan : निवृत्तीनंतरही घराचं स्वप्न पूर्ण करा, होम लोन घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

Home Loan : निवृत्तीनंतरही घराचं स्वप्न पूर्ण करा, होम लोन घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

गृहकर्ज घेण्यासाठी प्रत्येक बँकेची पात्रता वेगळी असते. त्यामुळे ती तपासणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच गृहकर्ज घेण्यासाठी वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

गृहकर्ज घेण्यासाठी प्रत्येक बँकेची पात्रता वेगळी असते. त्यामुळे ती तपासणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच गृहकर्ज घेण्यासाठी वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

गृहकर्ज घेण्यासाठी प्रत्येक बँकेची पात्रता वेगळी असते. त्यामुळे ती तपासणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच गृहकर्ज घेण्यासाठी वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

मुंबई, 14 जानेवारी : प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं घर (Dream Home) असावं असं स्वप्न असतं. अशा परिस्थितीत मध्यमवर्गीयांना घर घेण्यासाठी गृहकर्जाची (Home Loan) मदत घ्यावी लागते. अनेक वेळा घराच्या जबाबदाऱ्या पार पाडताना नोकरीच्या काळात लोकांना घर घेता येत नाही. सेवानिवृत्तीनंतर (Retirement) घराच स्वप्न पूर्ण करण्याचा विचार ते करतात. परंतु काही वेळा निवृत्तीनंतर घर मिळणे खूप त्रासदायक ठरू शकते. निवृत्तीनंतर कर्ज घेतानाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते कारण निवृत्तीनंतर कर्ज घेताना अटींचे पालन करावे लागते. तुम्हीही निवृत्तीनंतर गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या टिप्सचा अवलंब करू शकता.

सर्वात आधी तुमची पात्रता तपासा

गृहकर्ज घेण्यासाठी प्रत्येक बँकेची पात्रता वेगळी असते. त्यामुळे ती तपासणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच गृहकर्ज घेण्यासाठी वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे. यासह परतफेडीसाठी अर्जदाराचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तुम्हाला संपूर्ण कर्जाची परतफेड फक्त 5 वर्षांत परत करावी लागेल.

कोणत्या बँक खात्याला लिंक आहे तुमचं Aadhaar Card; असं शोधू शकता चुटकीसरशी

जास्त कर्ज घेऊ नका

निवृत्तीनंतर किमान कर्ज घेण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने EMI व्हॅल्यू कमी होते. यासोबतच बँकेच्या कर्जाचा जोखीम घटकही कमी होतो. त्यामुळे कर्ज मिळण्याची शक्यताही वाढते.

कायम निवृत्ती वेतन असणे आवश्यक आहे

जर कोणत्याही व्यक्तीला दर महिन्याला निश्चित पेन्शन मिळत असेल तर अशा लोकांना कर्ज मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. दर महिन्याला तुमच्या पेन्शनचा काही भाग कर्ज EMI म्हणून जमा होतो.

ब्रेन स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला समजदार व्यक्ती वाचवू शकतो; ही लक्षणं दिसली की ताबडतोब गाठा हॉस्पिटल

सरकारी बँकेतून कर्ज घ्या

निवृत्तीनंतर तुम्‍हाला पेन्शन मिळत असेल तर तुम्ही कर्जासाठी सरकारी बँकेशी संपर्क साधू शकता. यासोबतच तुम्हाला पर्सनल लोनही मिळू शकते.

First published:

Tags: Home Loan, Money, Pension