मराठी बातम्या /बातम्या /मनी /New Year 2022 : वर्ष संपायला राहिलेत फक्त 5 दिवस, 'ही' 5 कामे केलीत ना?

New Year 2022 : वर्ष संपायला राहिलेत फक्त 5 दिवस, 'ही' 5 कामे केलीत ना?

आयकर रिटर्न ( Income Tax Return ) किंवा आयटीआर फाइलिंग, आधार-पीएफ लिंकिंग, पेन्शनधारकांसाठी ( Pensioners ) हयातीचा दाखला ( Life Certificate) सादर करणे आदी कामे 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे.

आयकर रिटर्न ( Income Tax Return ) किंवा आयटीआर फाइलिंग, आधार-पीएफ लिंकिंग, पेन्शनधारकांसाठी ( Pensioners ) हयातीचा दाखला ( Life Certificate) सादर करणे आदी कामे 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे.

आयकर रिटर्न ( Income Tax Return ) किंवा आयटीआर फाइलिंग, आधार-पीएफ लिंकिंग, पेन्शनधारकांसाठी ( Pensioners ) हयातीचा दाखला ( Life Certificate) सादर करणे आदी कामे 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे.

    मुंबई, 27 डिसेंबर : 2021 हे वर्ष संपण्यास 5 दिवस बाकी आहेत. सरत्या वर्षाला निरोप देताानाच 2022 या नव्या वर्षाचं ( new year 2022 ) स्वागत करण्यासाठी तयारी सुरू आहे. मात्र, आयकर रिटर्न ( Income Tax Return ) किंवा आयटीआर फाइलिंग, आधार-पीएफ लिंकिंग, पेन्शनधारकांसाठी ( Pensioners ) हयातीचा दाखला ( Life Certificate) सादर करणे आदी कामे 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या ( important ) गोष्टी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण न केल्यास नवीन वर्षात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. 31 डिसेंबरपूर्वी तुम्हाला जी कामे प्राधान्याने करणे गरजेची आहेत,ती जाणून घेऊयात

    आयकर रिटर्न भरणं

    सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न ( ITR return ) भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली होती. नवीन आयकर पोर्टल आणि कोरोना विषाणूमुळे आलेल्या अडचणींमुळे मोदी सरकारने मुदत वाढवली होती. दंड टाळण्यासाठी करदात्यांना 31 डिसेंबरपर्यंत आयटीआर भरावा लागेल.

    हयातीचा दाखला देणं

    तुम्ही पेन्शनधारकांच्या श्रेणीत येत असाल तर तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत तुमचा हयातीचा दाखला बँकेत द्यावा लागेल. पेन्शनधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत हे प्रमाणपत्र सादर करावे, अन्यथा निवृत्ती वेतन मिळणे बंद होईल. वर्षातून एकदा पेन्शनधारकांना हयातीचा दाखला 30 नोव्हेंबरपूर्वी सादर करावा लागतो. परंतु यावेळी ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पेन्शनधारक जिवंत असल्याचा पुरावा म्हणून हयातीचा दाखला सादर करावा लागतो.

    केंद्र सरकारकडून मिळतोय 10 हजारांचा थेट लाभ, मार्चआधी 'ही' कामं करुन घ्या; काय आहे योजना?

    डिमॅट/ट्रेडिंग अकाउंटचं केवायसी

    सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटचं केवायसी ( KYC ) पूर्ण करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 ऐवजी 31 डिसेंबर 2021 केली आहे. डिमॅट, ट्रेडिंग अकाउंट केवायसी अंतर्गत नाव, पत्ता, पॅन, मोबाइल नंबर, वय, ई-मेल आयडी अपडेट करणं आवश्यक आहे.

    यूएएन (UAN) आणि आधार लिंक करणं

    कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांना यूएएन (UAN) क्रमांक आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. युएएनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. ईपीएफओ (EPFO) गुंतवणूकदारांसाठी आधार लिंक करणं अनिवार्य झालं आहे. असं न केल्यास येत्या काही दिवसांत त्यांना अडचणी येऊ शकतात. तसंच त्यांचं पीएफ खातं बंद होऊ शकतं.

    31 डिसेंबरआधी 'हे' काम करुन घ्या, अन्यथा सीज होईल बँक अकाऊंट

    कमी व्याजदरात गृहकर्ज

    तुम्ही बँक ऑफ बडोदा (BoB) चे ग्राहक असल्यास, तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत स्वस्त गृहकर्ज मिळवू शकता. सणासुदीच्या काळात बँक ऑफ बडोदाने गृहकर्जाचा दर 6.50 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. या दराने 31 डिसेंबरपर्यंत गृहकर्ज मिळू शकते.

    त्यामुळे तुमची राहिलेली कामं पूर्ण करा आणि निश्चिंतपणे नव्या वर्षात प्रवेश करा.

    First published:

    Tags: Aadhar card, Income tax, Pension