बँकेच्या KYC फॉर्ममध्ये द्यावी लागेल तुमच्या धर्माची माहिती, RBI ने केला बदल?

बँकेच्या KYC फॉर्ममध्ये द्यावी लागेल तुमच्या धर्माची माहिती, RBI ने केला बदल?

तुमच्या बँक खात्याच्या 'Know Your Customer' म्हणजेच KYC फॉर्मवर आता तुमच्या धर्माची माहिती द्यावी लागू शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : तुमच्या बँक खात्याच्या 'Know Your Customer' म्हणजेच KYC फॉर्मवर आता तुमच्या धर्माची माहिती द्यावी लागू शकते. यामुळे NRO खातं उघडण्यासाठी किंवा मुस्लिमांशिवाय अन्य धार्मिक अल्पसंख्याक लोकांना मालमत्ता खरेदीसाठी मदत होईल. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने फॉरिन एक्सेंज मॅनेजमेंट रेग्युलेशन मध्ये बदल केले आहेत. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन या सगळ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलाय.

पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्यांचा यामध्ये समावेश आहे. दीर्घकाळासाठी व्हिसा घेऊन भारतात राहणारे लोकही मालमत्ता खरेदीपासून ते बँक खातंही उघडू शकतात. या नियमात नास्तिक आणि मुस्लीम लोकांचा समावेश नसेल. त्याचबरोबर म्यानमार, श्रीलंका आणि तिबेट या देशांतून आलेले लोकही नसतील. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रिझर्व्ह बँकेकडून याबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं मिळालेली नाहीत.

(हेही वाचा : TikTok मुळे अनेक जण झाले मालामाल, तुम्हीही हे करा आणि लखपती व्हा)

सध्या KYC मध्ये मागितली जात नाही माहिती

एका बड्या सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक नियंत्रणासाठी बनवल्या गेलेल्या फेमा अॅक्टमध्ये धार्मिक तरतुदी आहेत. सेव्हिंग आणि करंट अकाउंटसाठी KYC फॉर्ममध्ये सध्या धार्मिक माहिती मागितली जात नाही.

तज्ज्ञांचं मत काय?

दलाल स्ट्रीट काही बँकिंग तज्ज्ञांना याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्याचवेळी कार्यकर्ते आणि वकिलांनी ही गोष्ट घटनाबाह्य असल्याचं म्हटलं आहे. आता हा नियम प्रत्यक्ष येणार आहे का ते पाहावं लागेल.

=========================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 21, 2019, 8:27 PM IST
Tags: bankingkyc

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading