नवी दिल्ली, 18 मार्च : येस बँकेच्या (YES Bank) खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. येस बँकेवर लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आता येस बँकेचे खातेदार त्यांच्या खात्यातून 50 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढू शकतात. त्याचप्रमाणे या बँकेच्या अन्य सेवा देखील पूर्ववत करण्यात आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर अर्थ मंत्र्यांनी सांगितलं होतं की, अर्थ मंत्रालयाकडून लवकरच येस बँक प्रकरणात (Yes Bank Crisis) नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे. हे नोटिफिकेशन आल्यानंतर 3 दिवसांच्या आत येस बँकेवरील निर्बंध हटवण्यात येणार आहेत. 3 दिवसांमध्येच मोरेटेरियम पीरियड (Moratorium On Yes Bank) संपवण्यात येईल. त्याप्रमाणे आज येस बँकेच्या सर्व सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत
(हे वाचा-सोन्याचे दर पुन्हा चाळीशीपार! इथे जाणून घ्या काय आहे बुधवारचा भाव)
5 मार्च रोजी येस बँकेवर आरबीआयकडून निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधनुसार येस बँकेच्या खातेदारांना केवळ 50,000 रुपयेच काढण्याची मुभा होती. 13 दिवसांनंतर येस बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्बंध हटवण्यात आल्यानंतर सरकारेन येस बँकेच्या पुनर्रचनेसाठी नवीन प्लॅन आखला आहे आणि प्रशांत कुमार यांची येस बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
(हे वाचा-सुप्रीम कोर्टाने टेलिकॉम कंपन्यांना फटकारलं, MDना दिला तुरूंगात पाठवण्याचा इशारा)
मंगळवारी संध्याकाळी प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली होती की, बँकेकडे आर्थिक कोणतीही कमतरता नाही आहे, त्याचप्रमाणे बँकेचे एटीएम देखील फूल्ल आहेत.
ऑनलाइन सुविधा सुद्धा पूर्ववत
Our banking services are now operational. You can now experience the full suite of our services. Thank you for your patience and co-operation. #YESforYOU @RBI @FinMinIndia
— YES BANK (@YESBANK) March 18, 2020
प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार येस बँकेच्या ऑनलाइन सुविधा सुद्धा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. बँकेतील एटीएममध्ये पैशांची कमतरता नाही आहे. तसंच बँकेचे ग्राहक बुधवारी 6 वाजल्यानंतर एटीएम, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग आणि मोबाइल अपचा वापर करू शकतात.
तुमचा पैसा सुरक्षित आहे का?
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अशी माहिती दिली आहे की, डिपॉझिटर्सची बँकेतील सर्व पूंजी सुरक्षित आहे. त्यांनी भारतातील बँकिग क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याची हमी दिली आहे. पब्लिक सेक्टरपासून प्रायव्हेट सेक्टरमधील सर्व बँका सुरक्षित असल्याचं ते म्हणाले.