'या' कंपनीला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्री झाली देशातली नंबर 1

'या' कंपनीला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्री झाली देशातली नंबर 1

सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ( RIL ) आता जास्त कमाई करणारी कंपनी झालीय.

  • Share this:

मुंबई, 21 मे : मार्केट कॅपच्या सांगण्याप्रमाणे देशातली सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ( RIL ) आता जास्त कमाई करणारी कंपनी झालीय. सरकारी कंपनी इंडियन आॅइल काॅर्पोरेशन ( IOC )ला मागे टाकत RIL देशातली सर्वात जास्त कमाई करणारी कंपनी झालीय. पेट्रोलियमपासून रिटेल आणि टेलिकाॅमसारख्या विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या RIL नं आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये एकूण 6.23 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर IOC नं31 मार्च 2019ला संपलेल्या आर्थिक वर्षात 6.17 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

राहुल गांधी नवज्योतसिंग सिद्धूवर नाराज, शिस्तभंगाच्या कारवाईची शक्यता

आकडेवारीवर एक नजर

2018-19मध्ये रिलायन्सचा नफा 39,588 कोटी रुपये होता. इंडियन आॅइलनं या संपलेल्या आर्थिक वर्षाचा नफा 17,274 कोटी रुपये नोंदवलाय.

रिलायन्सच्या कमाईत रिटेल, दूरसंचार आणि डिजिटल सर्विसमधून मिळणारा रिव्हेन्यू सर्वात जास्त आहे. म्हणून रिलायन्सच्या कमाईत वाढ झालीय.

शिवसेना 3 महिन्यांसाठी उपमुख्यमंत्रिपद घेणार नाही - सूत्र

जबरदस्त रिफायनिंग मार्जिन आणि मजबूत रिटेल व्यवसाय यामुळे आर्थिक वर्ष 2019मध्ये रिलायन्सनं 44 टक्के वाढ नोंदवलीय.

तसंच आर्थिक वर्ष 2010 आणि 2019मध्ये वर्षाला 14 टक्के वाढ नोंदवली गेलीय.

पिंपरीकरांवर नवं संकट, फक्त 30 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

IOCच्या व्यवसायाची वाढ 2019च्या आर्थिक वर्षात 30 टक्के आणि आर्थिक वर्ष 2015 आणि 2019च्या मध्ये ही वाढ 6.3 टक्क्यांपर्यंतच झालीय.

VIDEO :...नाहीतर ईव्हीएमसाठी शस्त्र हाती घेऊ, 'या' नेत्याने दिला इशारा

First published: May 21, 2019, 8:06 PM IST

ताज्या बातम्या