रिलायन्स रिटेलची मोठी गुंतवणूक, अर्बन लॅडरचा 96 टक्के हिस्सा घेतला विकत!

रिलायन्स रिटेलची मोठी गुंतवणूक, अर्बन लॅडरचा 96 टक्के हिस्सा घेतला विकत!

RRVL कडे आता अर्बन लॅडरचा (Urban Ladder) उरलेला हिस्सा खरेदी करण्यासाठी सुद्धा पर्याय बाकी आहे. जर हा हिस्सा रिलायन्सने विकत घेतला तर संपूर्ण कंपनीचा 100 टक्के हिस्सा हा रिलायन्सच्या ताब्यात असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची रिटेल सहाय्यक रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने होम डेकोर सॉल्युशन - अर्बन लॅडर कंपनीचा (Home Decor Solutions Private Ltd) 96 टक्के वाटा विकत घेतला आहे. हा व्यवहार 182.12 कोटी रोख रुपयांमध्ये झाला आहे.  RRVL कडे आता  अर्बन लॅडरचा (Urban Ladder) उरलेला हिस्सा खरेदी करण्यासाठी सुद्धा पर्याय बाकी आहे. जर हा हिस्सा रिलायन्सने विकत घेतला तर संपूर्ण कंपनीचा 100 टक्के हिस्सा हा रिलायन्सच्या ताब्यात असणार आहे.

RIL ने आणखी 75 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पुढील गुंतवणूक ही डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. भारतात अर्बन लॅडरची सुरुवात 17 फ्रेबुवारी 2012 मध्ये झाली होती. अर्बन लॅडर कंपनी ही होम फर्निचर आणि गृह सजावटीचे उत्पादन विक्री करणारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. त्याचबरोबर या कंपनीचे भारताबाहेर सुद्धा अनेक रिटेल स्टोर सुद्धा आहे.

या कंपनीची भारतात सुद्धा अनेक शहरांमध्ये किरकोळ स्टोअरची साखळी आहे. 2019 मध्ये अर्बन लॅडर कंपनीचा टर्नओव्हर 434 कोटी इतका होता. तर  49.41 कोटी नफा होता. आर्थिक वर्ष 2018 मध्ये कंपनीची उलाढाल ही 151.22 कोटी इतकी होती. तर 118.66 कोटींचे नुकसान झाले होते.

या नव्या व्यवहारामुळे रिलायन्स ग्रुपला डिजीटल आणि न्यू कॉमर्स क्षेत्रात व्यवसाय करण्यास जास्त मदत मिळणार आहे. सोबतच आपल्या ग्राहकांना जास्ती जास्त उत्पादन देण्यास सोईचे ठरणार आहे. त्याचबरोबर या व्यवहारामुळे बाजारात रिलायन्सचे स्थान आणखी भक्कम झाले आहे. RIL ने स्पष्ट केले आहे की, या व्यवहारासाठी कोणत्याही शासकीय परवानगी आवश्यकता नव्हती.

होम डेकोर सॉल्युशन कंपनी अर्बन लॅडरचे  दिल्ली-NCR, पुणे, बंगळुरूआणि चेन्नईमध्ये  ऑफलाइन स्टोर आहे. कंपनीचा नफा वाढल्यामुळे इतर शहरातही स्टोर सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे याचा फायदा हा रिलायन्स इंडस्ट्रीला होणार आहे.

Published by: sachin Salve
First published: November 15, 2020, 1:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या