जिओ प्लॅटफॉर्म (Jio Platform) मध्ये मोठी गुंतवणूक केल्यानंतर आता जगभरातील सर्वात मोठी टेक गुंतवणूकदार कंपनी असणारी एसएलपी (Silver Lake Partners) आता रिलायन्स रिटेलमध्ये (Reliance Retail) गुंतवणूक करत आहे.
मुंबई, 09 सप्टेंबर : जिओ प्लॅटफॉर्म (Jio Platform) मध्ये मोठी गुंतवणूक केल्यानंतर आता जगभरातील सर्वात मोठी टेक गुंतवणूकदार कंपनी असणारी एसएलपी (Silver Lake Partners) आता रिलायन्स रिटेलमध्ये (Reliance Retail) गुंतवणूक करत आहे. यातून असे स्पष्ट संकेत मिळत आहेत की रियालन्स रिटेल भारतीय किरकोळ बाजारात तंत्रज्ञानाच्या आधारावर बदलाव घडवून आणण्याासठी पुढाकार घेत आहे.
खाजगी इक्विटी फर्म सिल्व्हर लेक पार्टनर्स रिलायन्स समुहाच्या (RIL) रिलायन्स रिटेलमध्ये 7500 कोटींची गुंतवणूक करत आहेत. एसएलपीने या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेलमधील 1.75 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. याआधी सिल्ह्वर लेकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 2.08 टक्के भागीदारी खरेदी केली होती. रिलायन्स समुहाची सब्सिडिअरी कंपनी असणारी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड फ्यूचर ग्रृपमधील रिटेल अँड होलसेल बिझनेस, लॉजिस्टिक तसंच वेअर हाउसिंग बिझनेसचे संपादन करत आहे. यामुळे रिलायन्सची पोहोच फ्यूचर ग्रृपच्या बिग बझार, ईझीडे आणि एफबीबीच्या 1800 हून अधिक स्टोअर्सपर्यंत जाईल. हे स्टोअर्स देशभरात 420 हून अधिक शहरात आहेत. 24713 कोटींमध्ये हा करार करण्यात आला आहे.
रिलायन्स रिटेलचा एसएलपीबरोबर करार
जगभरातील सर्वात मोठी टेक गुंतवणूकदार कंपनी Silver Lake Partners रिलायन्स रिटेलमध्ये 7500 कोटींची गुंतवणूक करत आहे. याकरता रिलायन्स रिटेलचे मुल्यांकन 4.21 लाख कोटी आहे. सिल्ह्वर लेकची रिलायन्स समुहातील ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे. याआधी त्यांनी 2020 च्या सुरुवातीला जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 10,202.55 कोटींची गुंतवणूक केली आहे.
(हे वाचा-भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत! यावर्षी GDPमध्ये 10.5 टक्के घसरण होण्याचा अंदाज)
जगभरातील दिग्गज कंपनींमध्ये गुंतवणूक करण्याचा एसएलपीचा रेकॉर्ड आहे. एसएलपीने आतापर्यंत ट्विटर, Airbnb,अलीबाबा, डेल टेक्नॉलॉजिज, ANT Financials, अल्फाबेट Waymo यांसारख्या अनेक बड्या टेक कंपन्यांमध्ये एसएलपीची गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक म्हणजे आरआयएलच्या तंत्रज्ञान आणि ग्राहक व्यवसाय क्षमतेचे, व्यवसाय मॉडेलचे आणि दीर्घकालीन वाढीच्या संभाव्यतेचे मोठे समर्थन आहे.
(हे वाचा-यावर्षी SBI देणार 14000 जणांना नोकरीची संधी, वाचा काय आहे योजना)
या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेलचा आरआयएलच्या मूल्यांकनामध्ये 9 लाख कोटी रुपयांचा वाटा आहे. हा करार महत्त्वपूर्ण आहे कारण आरआयएल आपला किरकोळ व्यवसाय वाढवत आहे. त्याचप्रमाणे Amazon आणि वॉलमार्टच्या मालकीचे फ्लिपकार्टशी टक्कर देण्यासाठी ही गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.