मुंबई, 24 मार्च : रिलायन्स रिटेल बिझनेसच्या प्रमुख ईशा अंबानी जेननेक्स्ट उद्योजिका बनल्या आहे. त्यांना जेननेक्स्ट उद्योजिका पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स 2023 मध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. शुक्रवारी 12 व्या फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्सचा सोहळा झाला. त्यावेळी ईशा यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
ईशा या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्या कन्या. पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद यांच्या पत्नी आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी ईशा यांची रिलायन्स रिटेलच्या प्रमुख म्हणून जाहीर केलं.
प्रत्येक बँक बदलून देत नाही फाटलेली नोट, तुम्हाला नियम माहिती आहे का?
आता ईशा यांना जेननेक्स्ट उद्योजिका पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. आपल्या या पुरस्काराचं श्रेय ते आपल्या पालकांना देतात. पालकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच या पुरस्कारावेळी त्यांनी आपली मुलं आदिशक्ती आणि कृष्णा यांचाही आवर्जून उल्लेख केला.
ईशा आणि आनंद यांनी सप्टेंबर 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो इथं साखरपुडा केला. त्यानंतर भारतात उदयपूरमध्ये त्यांच्या लग्नापूर्वीचा भव्य सोहळा थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाला बॉलिवूड आणि राजकारण, व्यवसाय आणि क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.
या हाय-प्रोफाइल लग्नाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव आणि फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रतन टाटा, बच्चन, रजनीकांत, आमिर खान, सचिन तेंडुलकर यांनी हजेरी लावली.
Fixed Deposit मध्ये पैसे ठेवलेल्यांसाठी आनंदाची बातमी, पाहा RBI ने काय घेतलाय निर्णय
मुकेश अंबानी यांना तीन मुले आहेत. जुळी मुले आकाश-ईशा आणि सर्वात धाकटा मुलगा अनंत. आकाश यांनी मार्च 2019 मध्ये हिरे उद्योगपती रसेल मेहता यांची मुलगी श्लोकाशी लग्न केले. त्यांना दोन वर्षांचा मुलगा पृथ्वी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.