मराठी बातम्या /बातम्या /मनी /

फॅशनच्या दुनियेत Reliance Retail ची झेप, डिझायनर रितु कुमारच्या कंपनीत 52 टक्के भागीदारी

फॅशनच्या दुनियेत Reliance Retail ची झेप, डिझायनर रितु कुमारच्या कंपनीत 52 टक्के भागीदारी

 रिलायन्स इंडस्ट्रीजची सहयोगी कंपनी असणाऱ्या रिलायन्स रिटेल्सच्या फॅशन डिझायनर (Reliance retail acquires 52 percent stake in Ritu Kumar brand) रितु कुमार यांच्या कंपनीतील 52 टक्के वाटा खरेदी केला आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 19 ऑक्टोबर : रिलायन्स इंडस्ट्रीजची सहयोगी कंपनी असणाऱ्या रिलायन्स रिटेल्सच्या फॅशन डिझायनर (Reliance retail acquires 52 percent stake in Ritu Kumar brand) रितु कुमार यांच्या कंपनीतील 52 टक्के वाटा खरेदी केला आहे. रितु कुमार यांनी कंपनी रितिका प्रायव्हेट लिमिटेडची मालकी त्यामुळे रिलायन्सकडे आली असून फॅशन जगतातील हा एक मोठा करार मानला जात आहे. रितु कुमार, लेबल रितु कुमार, आरआय रितु कुमार, आरके आणि रितु कुमार होम अँड लिव्हिंग ब्रँड या कंपन्यांची मालकी मिळवण्यासाठी फर्म एव्हरस्टोन ग्रुपकडे असणारे 35 टक्के शेअर्स रिलायन्सनं खरेदी केले आहेत.

1970 च्या दशकात सुरू झाला ब्रँड

फॅशन डिझायनर रितु कुमार यांनी 1970 च्या दशकात आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली होती. 2002 साली लेबल रितु कुमार हा ब्रँड लॉन्च कऱण्यात आला होता. तरुण आणि ग्लोबल क्लायंट डोळ्यासमोर ठेऊन या ब्रँडमार्फत कपडे तयार केले जात असत. आरआय रितु कुमार हा ब्रँड महिलांचे लग्नासाठीचे खास कपडे तयार करण्यासाठी नावारुपाला आला. यातील उत्पादनं हेअरलुममध्ये गणली जातात. देशातील सर्वोत्तम कारागिर आणि हस्तकलेत प्रवीण असणारे कलाकार या ब्रँडसाठी काम करतात. आर्के हा कंपनीचा सर्वात मोठा आणि प्रसिद्ध ब्रँड असून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने त्याची सुरुवात करण्यात आली होती.

हे वाचा- Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढ, चांदीही महागली

विस्ताराला वाव

रितु कुमार यांच्या ब्रँडचा विस्तार करण्यासाठी बराच वाव असून या करारामुळं आपल्याला अतीव आनंद झाल्याची प्रतिक्रिया  रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक ईशा अंबानी यांनी दिली आहे. या ब्रँडच्या फॅशनमध्ये नावीन्य असून पुढील पिढ्यांना अधिक सुंदर आणि समृद्ध कऱण्याचं काम हा ब्रँड करत राहिल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Business, Fashion, Reliance