Home /News /money /

रिलायन्सची आणखी एक महत्त्वाची गुंतवणूक, Ambri Inc मध्ये RNESL गुंतवणार मोठी रक्कम

रिलायन्सची आणखी एक महत्त्वाची गुंतवणूक, Ambri Inc मध्ये RNESL गुंतवणार मोठी रक्कम

अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समध्ये असलेल्या अँब्री आयएनसी या एनर्जी स्टोरेज कंपनीमध्ये रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (Reliance New Energy Solar Ltd RNESL) 144 मिलियन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

मुंबई, 10 ऑगस्ट: अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समध्ये असलेल्या अँब्री आयएनसी या एनर्जी स्टोरेज कंपनीमध्ये रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (Reliance New Energy Solar Ltd RNESL) 144 मिलियन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (RIL) उपकंपनी असून या कंपनीत पॉलसन अँड कंपनी आयएनसी आणि बिल गेट्स यांच्यासह काही गुंतवणूकदारांची गुंतवणूक आहे. आरआयएलने या नव्या गुंतवणुकीबद्दल प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यात म्हटलंय की, दीर्घकाळ उर्जा साठवून ठेवणाऱ्या अँब्री आयएनसीच्या (Ambri Inc) सिस्टिम्सचा फायदा रिलायन्सला जगभरातील व्यवसायवृद्धीसाठी होणार आहे. अँब्री आयएनसीमधील 42.3 मिलियन प्रिफर्ड शेअर्सपैकी शेअर विकत घेण्यासाठी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड कंपनी 50 मिलियन अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. अँब्रीच्या पेटंटेड टेक्नॉलॉजीवर (Patented Technology) आधारित डिझाइन केलेल्या सिस्टिम्समुळे 4-24 तास उर्जा साठवण्याची क्षमता उपलब्ध होणार असून त्यामुळे सामान्य उर्जा साठवण्याच्या ग्रीडमध्ये (Power Grid) वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरींशी संबंधित किंमत, दीर्घकाळ उर्जा साठवणूक आणि सुरक्षितता या मुद्यांशी संबंधित प्रश्नांवर उत्तर मिळणार आहे. म्हणजेच या ग्रीडमध्ये अधिक खर्चात कमी वेळ उर्जा साठवली जाते आणि सुरक्षितताही कमी असते. हे सर्व प्रश्न अँब्रीच्या नव्या सिस्टिम्समुळे सुटतील. दिवसेंदिवस रिन्युएबल एनर्जी इलेक्ट्रिक पॉवर ग्रीडमध्ये परावर्तित करण्याचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे ही साठवणूकीची सिस्टिम्स खूपच उपयुक्त ठरणार आहे असंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. हे वाचा-SBI Alert! लवकर पूर्ण करा हे काम अन्यथा खात्यावर होईल परिणाम,पैसे अडकण्याची भीती भारतात बॅटरी उत्पादनासाठी मोठा प्लांट उभारण्यासंबंधीही रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड कंपनी आणि अँब्री या कंपन्यांमध्ये चर्चा सुरू असून त्यामुळे रिलायन्स ग्रीन एनर्जी (Green Energy) इन्हिशिएटिव्ह या रिलायन्सच्या अन्य एका उपक्रमाला बळ मिळणार असून त्याचा खर्च कमी होणार आहे, असंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. जून 2021 मध्ये आपल्या शेअर होल्डर्सना मार्गदर्शन करताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी धीरुभाई अंबानी ग्रीन एनर्जी गिगा कॉम्प्लेक प्रोजेक्टअंतर्गत जामनगरमध्ये इंटरमिटंट एनर्जी साठवण्यासाठी गिगा फॅक्टरी सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते, 'आपण जी उर्जा निर्माण करणार आहोत ती साठवण्यासाठीच्या मोठ्या ग्रीड बॅटरींसाठी लागणारं अद्ययावत इलेक्ट्रो-केमिकल तंत्रज्ञान आम्ही विकसित करत आहोत. उर्जा निर्मिती, साठवणूक आणि ग्रीड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून दिवसरात्र उर्जा उपलब्ध व्हावी आणि उच्च दर्जाची सेवा मिळावी यासाठी आम्ही बॅटरी टेक्नॉलॉजी क्षेत्रातील जगातल्या आघाडीच्या कंपन्यांशी करार करणार आहोत.' हे वाचा-देशभरात एकाच क्रमांकावर करावा लागेल LPGसाठी कॉल,मिस्ड कॉल देऊन रिफिल करा सिलेंडर या प्रसिद्धीपत्रकानुसार सध्या अँब्री 10 MWh पासून ते 2 GWh इतकी एनर्जी स्टोरेज सिस्टिची आवश्यकता असलेल्या रिलायन्सच्या प्रकल्पांसोबत काम करणार आहे. कंपनी कॅल्शियम आणि अँटिमनी (Calcium and Antimony) इलेक्ट्रोड तयार करणा आहे जे स्वस्तही असतील आणि लिथियम-आयन बॅटरीतील इलेक्ट्रोडच्या तुलनेत अधिक सक्षमही असतील. कोणत्याही हवामानात हे इलेक्ट्रोड सुरक्षितपणे 20 वर्षं वापरता येतील. दिवसातल्या सौर उर्जेपासून संध्याकाळी उर्जा निर्मिती करण्यात अम्ब्री आयएनसीची सिस्टिम प्रवीण आहे. 2023 पासून पुढे मोठ्या प्रमाणात कमर्शियल ऑपरेशन्स असणाऱ्या ग्राहकांनाच अम्ब्री आयएनसी सेवा देते असंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
First published:

Tags: Reliance, Reliance Industries

पुढील बातम्या