Reliance Jio चे दर ठरणार ट्रायच्या नियमांनुसारच, कंपनीचं स्पष्टीकरण

Reliance Jio चे दर ठरणार ट्रायच्या नियमांनुसारच, कंपनीचं स्पष्टीकरण

Vodafone Idea आणि Bharti Airtel या कंपन्यांनंतर आता Reliance Jio ही दर वाढवण्याचा विचार करते आहे. याआधी, Vodafone Idea आणि Bharti Airtel या कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून दरवाढीची घोषणा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : Vodafone Idea आणि Bharti Airtel  या कंपन्यांनंतर आता Reliance Jio ही दर वाढवण्याचा विचार करते आहे. पुढच्या काही दिवसांत हे दर वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल पण त्याचा डिजिटल क्षेत्राच्या वाढीवर काही परिमाण होणार नाही,असंही कंपनीने म्हटलं आहे. सरकार आणि ट्राय यांना जर वाटलं तरच Jio चे दर वाढवण्यात येतील, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. भारतातल्या प्रत्येकाला परवडेल असा डिजिटल डाटा देण्यावर कंपनीचा भर राहील आणि डिजिटल इंडियाची वाढही होईल,असंही कंपनीने म्हटलं आहे. दुसऱ्या कंपन्यांनी दर वाढवल्यामुळे Jio ने दर वाढवण्याचा निर्णय घेतलेला नाही, असं स्पष्टीकरण Jio ने दिलं आहे.

We should clearly highlight in the story that Jio will increase tariff only if the govt and regulator want it. Second, they will continue with their commitment on affordable data to ensure that Digital India continues to grow

याआधी, Vodafone Idea आणि Bharti Airtel या कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून दरवाढीची घोषणा केली आहे. मोबाइल डाटाच्या सेवेला मोठी मागणी असली तरी भारतात मोबाइल डाटाचे दर जगभरात सगळ्यात स्वस्त आहेत. 1 डिसेंबरपासून या दरात वाढ केली जाईल, असं कंपनीने म्हटलं होतं.

टेलिकॉम क्षेत्र आर्थिक संकटात आहे आणि असं असतानाही मोबाइल डाटा स्वस्त असल्याने आम्हाला दरात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागतोय, असं Vodafone Idea ने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं.

Vodafone Idea ने गेल्या आठवड्यात आपल्याला 50 हजार 921 कोटींचा तोटा झाल्याचं म्हटलं होतं. यावर्षी सप्टेंबर महिन्यात संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंतचा सगळ्यात तोटा झाल्याचं कंपनीचं म्हणणं होतं.

(हेही वाचा : SBI च्या ग्राहकांना ATM सेंटरमध्ये जाण्याची नाही गरज, इथून काढू शकता पैसे)

Airtel, Vodafone Idea आणि इतर टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे 1.4 लाख कोटी रुपये द्यायचे आहेत. टेलिकॉम खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार भारती एअरटेलला 62 हजार 187 कोटी रुपये द्यायचे आहेत तर Vodafone Idea कंपनीला 54 हजार 184 कोटी रुपये द्यायचे आहेत.

Vodafone Idea चे CEO रवींद्र ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबद्दल आमची सरकारशी चर्चा सुरू आहे. टेलिकॉम क्षेत्राची चांगली वाढ व्हावी अशीच सरकारची इच्छा आहे. या क्षेत्रात 3 खाजगी कंपन्या आणि एक सरकारी कंपनी असावी, असं सरकारचं स्पष्ट धोरण आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

============================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 19, 2019, 7:24 PM IST

ताज्या बातम्या