Home /News /money /

ग्राहकांची रिलायन्स JIO ला पसंती! जुलै महिन्यात वाढले 35 लाख सब्सक्रायबर्स

ग्राहकांची रिलायन्स JIO ला पसंती! जुलै महिन्यात वाढले 35 लाख सब्सक्रायबर्स

ट्रायने (TRAI) नुकताच जाही केलेल्या मासिक अहवालानुसार रिलायन्स जिओने (Reliance Jio) जुलै महिन्यात 35 लाखांहून अधिक सबस्क्रायबर मिळवले आहेत.

    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : रिलायन्स समूहाचा डिजिटल प्लॅटफॉर्म असणाऱ्या जिओची (Reliance Jio) यशस्वी घौडदौड सुरुच आहे. गेल्या काही महिन्यात जिओने आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांबरोबर काही मोठे करार केले आहेत. दरम्यान सब्सक्रायबर्सची देखील जिओला पसंती मिळते आहे. ट्रायने नुकताच जाही केलेल्या मासिक अहवालानुसार रिलायन्स जिओने जुलै महिन्यात 35 लाखांहून अधिक सबस्क्रायबर मिळवले आहेत. दुसरीकडे व्हीआय (VI) अर्थात वोडाफोन आयडियाने (Vodafone Idea) मात्र, 37 लाख ग्राहक गमावल्याची या अहवालात नोंद आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (TRAI) हा मासिक अहवाल असून यानुसार भारताच्या वायरलेस मार्केटमध्ये 35.03 टक्के वाटा असल्याने जिओ टॉपवर आहे. दरम्यान, ट्रायच्यानुसार व्हीआय ही भारतातील तिसरी सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असून त्याची भागीदारी ही 26.34 टक्के आहे. जी भारती एअरटेलपेक्षा कमी आहे. एअरटेलची भागीदारी ही 27.96 टक्के आहे. जून आणि जुलैअखेर वायरलेस सबस्क्रायबरची संख्या वाढून 114 कोटींहून ती 114.4 कोटींवर गेली आहे. (हे वाचा-SBI च्या 42 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी! काही तासापासून ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प) ग्रामीण भागात वायरलेस सबस्क्रिप्शनमध्ये थोडी वाढ नोंदविण्यात आली आहे. तर शहरी भागांत ती 0.25 टक्के आहे. कोरोनाच्या संकटकाळात वायरलेस टेलिडेन्सिटी ही जूनच्या अखेर 84.38 टक्क्यांवरून 84.56 टक्क्यांपर्यंत वाढली़ आहे. ब्रॉडबाँड क्षेत्राचा विचार केला असता अव्वल पाच सेवा पुरवठादारांचा बाजारातील हिस्सा हा 98.91 टक्के आहे. (हे वाचा-तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 5374 रुपये प्रति तोळाने उतरली किंमत) रिलायन्स जिओचा हिस्सा 56.98 टक्के असून यामध्येही कंपनी अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर 22.08 टक्क्यांवर एअरटेल, 1634 टक्क्यांवर व्हीआय आणि 3. 26 टक्क्यांवर बीएसएनएल आणि अॅट्रिया कनव्हरजन्स हे 0.24 टक्कयांवर पाचव्या स्थानावर आहे. जुलैमध्ये ब्रॉडबँड ग्राहकांत 1.03 टक्के वाढ नोंदविण्यात आली असून ही संख्या वाढून 70.5 कोटी झाली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Reliance Jio

    पुढील बातम्या