Home /News /money /

Reliance मध्ये आणखीन एका कंपनीची मोठी गुंतवणूक

Reliance मध्ये आणखीन एका कंपनीची मोठी गुंतवणूक

आतापर्यंत रिलायन्स रिटेलमध्ये 6.87 टक्के शेअर्समध्ये 30 हजार 360 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

    ुपमुंबई, 03 ऑक्टोबर : सिंगापूरची गुंतवणूकदार कंपनी जीआयसी (GIC) भारतातील अग्रगण्य रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये (RIL) 5 हजार 512. 5 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील नावजलेल्या अग्रगण्य कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेत आहेत त्या यादीमध्ये आता या गुंतवणूकदार कंपनीचाही समावेश झाला आहे. ‘रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये (RRVL) या कंपनीने 1.22 टक्क्यांच्या स्टेक व्हॅल्यूची खरेदी केली असून, ज्याची प्री-मनी इक्विटी व्हॅल्यु 4.285 लाख कोटी रुपयेइतकी होते. गेल्या काही दिवसांत रिलायन्समध्ये गुंतवणूक करणारी ही जगातील सहावी मोठी कंपनी आहे,’ अशी माहिती मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (आरआयएल) वतीने 2 ऑक्टोबरला रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, ‘ जीआयसी कंपनीचं जागतिक स्तरावर असलेलं उद्योगाचं जाळं आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकी बहुमूल्य आहेत त्यामुळे भारतीय रिटेल क्षेत्राचं चित्र पालटून टाकायला मदत होईल. या गुंतवणुकीमुळे आमची स्ट्रॅटर्जी आणि भारताची क्षमता यावर शिक्कामोर्तब झालं आहे.’ या 6 सरकारी बँकाना लागू होणार नाहीत RBIचे नियम, ग्राहकांवर काय होणार परिणाम? जीआयसीचे सीईओ लिम चो कियाट म्हणाले, ‘रिलायन्स रिटेल आपल्या सप्लाय चेन आणि स्टोअर्सचं जाळणं आणखी विस्तारत राहील यावर आमचा विश्वास आहे. जबरदस्त लॉजिस्टिक्स आणि डेटा इन्फ्रास्ट्रक्चर या क्षमतांमुळे कंपनीचे ग्राहक आणि शेअर होल्डर्स यांच्यासाठी ही गुंतवणूक अधिकच मौल्यवान ठरते.’ आतापर्यंत रिलायन्स रिटेलमध्ये 6.87 टक्के शेअर्समध्ये 30 हजार 360 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल व्यवसायात 1.4 टक्क्यांची म्हणजे 6 हजार 247.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं अबू धाबीतील स्टेट फंड मुबादाला इनव्हेस्टमेंट कंपनीने जाहीर केलं आहे. सिल्व्हर लेकच्या को-इन्व्हेस्टर आणि जनरल अटलांटिकसोबतची ही गुंतवणूक गेल्या तीन आठवड्यांतील रिलायन्स रिटेलमधील सहावी गुंतवणूक असून त्याची प्री-इक्विटी किंमत 4.285 लाख कोटी रुपये आहे. रिलायन्स रिटेल ही कंपनी भारतातील सर्वांत मोठी, वेगाने विकसित होणारी आणि सर्वांत नफ्यात असलेला रिटेल उद्योग चालवते. रिलायन्स रिटेलच्या देशभरातील सुमारे 12 हजार स्टोअर्समध्य 640 दशलक्ष ग्राहक (footfall) खरेदी करतात. ATM संदर्भातील ही 3 कामं आजच करा पूर्ण, नेहमी सुरक्षित राहतील तुमचे पैसे सिंगापूरच्या परदेशी ठेवींचं व्यवस्थापन करण्यासाठी 1981 मध्ये जीआयसीची स्थापना करण्यात आली असून, जीआयसी ही सध्याची आंतरराष्ट्रीय दर्जाची आघाडीची इन्व्हेस्टमेंट फर्म आहे. शिस्तबद्धपणे दीर्घकालीन गुंतवणूक करणारी गुंतवणूकदार कंपनी जीआयसीने जगभरात इक्विटी, फिक्स्ड इन्कम, प्रायव्हेट इक्विटी, रियल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध संपत्तींच्या प्रकारांत विभागून आपली गुंतवणूक केली आहे, असं रिलायन्सच्या पत्रकात म्हटलं आहे. जीआयसीने 40 देशांत गुंतवणूक केली असून, गेल्या दोन दशकांपासून उदयोन्मुख बाजारांत ती गुंतवणूक करत आहे. या कंपनीचं मुख्यालय सिंगापूरमध्ये असून जगभरातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रमुख शहरांमध्ये 10 ऑफिसेसमध्ये कंपनीचे 1700 कर्मचारी काम करतात. जीआयसीने केलेल्या गुंतवणूकीची रक्कम लवकरच जमा होणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. या व्यवहारासाठी मॉर्गन स्टॅन्ले कंपनीने रिलायन्स रिटेलचा फायनॅनशियल अडव्हायजर म्हणून काम पाहिलं. सिरील अमरचंद मंगलदास आणि डेव्हिस पॉल्स अँड वॉर्डवेल यांनी कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलं.
    First published:

    Tags: Reliance

    पुढील बातम्या