देशाची नंबर 1 कंपनी झाली रिलायन्स इंडस्ट्री, 'ही' आहे फाॅर्च्युन ग्लोबल 500ची लिस्ट

देशाची नंबर 1 कंपनी झाली रिलायन्स इंडस्ट्री, 'ही' आहे फाॅर्च्युन ग्लोबल 500ची लिस्ट

Reliance Industry, Mukesh Ambani - फाॅर्च्युन ग्लोबल 500 च्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीनं 46वं स्थान पटकावलं आणि ती देशातली नंबर 1 झाली. पाहा इतर कंपन्यांचं स्थान

  • Share this:

मुंबई, 24 जुलै : रिलायन्स इंडस्ट्रीजनं ( RIL ) फाॅर्च्युन ग्लोबल 500च्या यादीत 46वं स्थान पटकावलंय. त्यामुळे आता ही कंपनी नंबर 1 बनलीय. याआधी सरकारी कंपनी इंडियन आइल काॅर्पोरेशन ( IOC )  फाॅर्च्युन 500 भारताच्या  यादीत पहिल्या स्थानावर होती. या यादीत ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC), भारतीय स्टेट बँक (SBI), टाटा मोटर्स, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) और राजेश एक्सपोर्ट्स या कंपन्याही आहेत. यात ONGC 37व्या नंबरावरून 160 स्थानावर पोचलीय. अमेरिकन कंपनी वाॅलमार्ट फाॅर्च्युन 500 यादीत टाॅपवर आहे. तर चीनची सरकारी तेल आणि गॅस कंपनी सिनोपेक ग्रुप पहिल्या स्थानावरून दुसऱ्या नंबरवर पोचलीय.

फाॅर्च्युन ग्लोबल 500ची यादी

नेदरलँडची कंपनी डच शेल तिसऱ्या आणि चायना नॅशनल पेट्रोलियम अँड स्टेट ग्रिड चौथ्या स्थानावर आहे.

सौदी अरबची पेट्रोलियम क्षेत्रातली मोठी कंपनी सौदी अरामको पहिल्यांदा पहिल्या 10मध्ये पोचलीय. ती 6व्या स्थानावर आहे. तर बीपी, एक्सॉन मोबिल, फॉक्सवॅगन आणि टोयोटा मोटर क्रमश: 7व्या, 8व्या, 9व्या आणि 10व्या स्थानावर आहे.

कमी गुंतवणुकीत जास्त फायदा, रोज कमवा 4 हजार रुपये

भारताच्या या कंपन्यांचं यादीत स्थान

देशातली सर्वात मोठी कंपनी SBI 20व्या स्थानावरून 236व्या स्थानावर पोचलीय.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिलासा, पण लवकरच वाढणार दर

टाटा मोटर्स 33व्या स्थानावरून 265व्या स्थानावर आहे. बीपीसीएल 39 पायऱ्या चढून 236व्या स्थानावर पोचलीय. तर राजेश एक्सपोर्टस् 495व्या स्थानावर पोचलीय.

भारताच्या 3 दिग्गज खेळाडूंचा पहिला टी20 सामना ठरला होता अखेरचा!

IOC 117व्या स्थानावर आहे. 2019मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची मिळकत 32.1 टक्के वाढून 82.3 अब्ज डाॅलर्सवर पोचली. 2018मध्ये ती 62.3 अब्ज डाॅलर होती.

IOC ची मिळकत 17.7 टक्के वाढलीय. ती 65.9 अब्ज डाॅलर्सवरून 77.6 अब्ज डाॅलर्स झालीय.

VIDEO: बीडमध्ये प्रवाशांकडून रेल्वे कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

First Published: Jul 24, 2019 02:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading