मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Relianceचा आणखी एक मोठा करार, खरेदी करणार IMG Worldwide LLC या अमेरिकन कंपनीची भागीदारी

Relianceचा आणखी एक मोठा करार, खरेदी करणार IMG Worldwide LLC या अमेरिकन कंपनीची भागीदारी

रिलायन्स इंडस्ट्री (Reliance Industry) आता स्पोर्ट्स बिझनेसमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी IMG-Reliance जॉइंट व्हेंचरमधील IMG Worldwide LLC ची भागीदारी खरेदी करणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर: देशातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीने (Reliance Industry) कोरोना काळात जगभरातील विविध क्षेत्रांतील कंपन्यांशी करार केले आहेत. या काळात रिलायन्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली. रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्म (Jio Platform) मध्ये देखील जगभरातील दिग्गज कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. आता रिलायन्स समुह एका मोठ्या अमेरिकन कंपनीतील भागीदारी खरेदी करणार आहेत. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स समुहाने आता स्पोर्ट्स बिझनेसकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रिलायन्स आता IMG-रिलायन्स या जॉइंट व्हेंचरमधील IMG Worldwide LLC ची भागीदारी खरेदी करणार आहे. मनीकंट्रोलच्या बातमीनुसार हा करार 52 कोटी रुपयांचा असणार आहे. आईएमजी-रिलायन्स लिमिटेड (IMG-Reliance)  मध्ये IMG Worldwide ची 50 टक्के भागीदारी असणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज IMG Worldwide LLC बरोबर स्पोर्ट्स मॅनेजमेंट बिझनेसचा व्यवसाय करत आहे. (हे वाचा-आठवड्याला 97 कोटी होती कमाई,पण एवढ्याच किंमतीला विकली Michael Jacksonची संपत्ती) रिलायन्सने शेअर बाजारांना दिलेल्या सूचनेमध्ये असं म्हटलं आहे की हा करार पूर्ण झाल्यानंतर IMG-Reliance पूर्णपणे रिलायन्सची सहयोगी कंपनी होईल. एवढंच नव्हे तर हा करार पूर्ण झाल्यानंतर या जॉइंट व्हेंचर ब्रँडचं नाव देखील बदलण्यात येणार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. IMG Singapore Pte Ltd जो इंटरनॅशनल मॅनेजमेंट ग्रुप (International Management Group) ची सब्सिडियरी कंपनी आहे त्याच्याकडे या जॉइंट व्हेंचरमधील 50 टक्के हिस्सा आहे. (हे वाचा-तुम्ही ITR फाइल केला का? ही आहे शेवटची तारीख, 3.97 कोटी करदात्यांनी भरला रिटर्न) रिलायन्स इंडस्ट्रीजने 2010 मध्ये IMG Worldwide बरोबर जॉइंट व्हेंचरची निर्मिती केली होती. भारतात खेळ आणि मनोरंजन व्यवसायाची वृद्धी करणं हे या जॉइंट व्हेंचरचं लक्ष्य होतं. या व्यवसायांची वृद्धी, त्यांचे मार्केटिंग आणि मॅनेजमेंट असं या जॉइंट व्हेंचरचं लक्ष्य होतं. IMG भारतासह एकूण 30 देशांमध्ये स्पोर्ट्स, इव्हेंट, मीडिया आणि फॅशन बिझनेसमध्ये आहे.
First published:

Tags: Mukesh ambani, Reliance

पुढील बातम्या