महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी Reliance Foundationची US च्या मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशीप

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी Reliance Foundationची US च्या मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशीप

जेव्हा महिला जागृत होतात तेव्हा कुटुंब जागृत होतं, आणि समाज आणि देशाच्या प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात, असं म्हणत नीता अंबानी यांनी या उपक्रमाची सुरुवात केली

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : रिलाईन्स फाऊंडेशन (Reliance Foundation) च्या चेयरपर्सन नीता अंबानी (Nita Ambani) यांनी भारतात डिजिटल जेंडर डिवाइड संपविण्यासाठी ‘यूनाइटेड स्टेट एजेंसी फॉर इंटरनेशनल डेव्हलपमेंट’ म्हणजेच  USAID सोबत हातमिळवणी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि एडवाइजर इवांका ट्रम्प मुख्य पाहुण्या म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2019 मध्ये जगभरातील महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी ‘वूमेंस ग्लोबल डेवलेपमेंट प्रोस्पेरिटी’ म्हणजेच W-GDP इनिशिएटिव लॉन्च केलं होतं. याच्या निर्मितीसाठी इवांका ट्रम्प यांची महत्वपूर्ण भूमिका होती. W-GDP इनिशिएटिवचं लक्ष्य 2025 पर्यंत विकासशील देशांतील 50 लाख महिलांपर्यंत पोहोचविणे आहे.

W-GDP इनिशिएटिवअंतर्गत तहत रिलाईस फाउंडेशन आणि USAID एकत्रितपणे काम करतील. ही महत्त्वपूर्ण घोषणा W-GDP अंतर्गत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अमेरिकेचे उपमंत्री स्टीफन बेजगुन यांनी केली. कार्यक्रमात यूएसएआयडीचे उपप्रशासक बोनी ग्लिकही सहभागी झाले होते.

कार्यक्रमाला वर्च्युअली संबोधित करीत नीता अंबानी म्हणाल्या, मला ही घोषणा करताना अत्यानंद होत आहे आणि गर्व आहे की USAID सह संयुक्तपणे रिलाईस फाउंडेशन आणि W-GDP काम करीत आहेत. आम्ही 2020 मध्ये भारतभरात एकत्रित डब्ल्यू-जीडीपी वुमनकनेक्ट चॅलेंज लॉन्च करणार आहोत. आमचं लक्ष्य, भारतातील लिंगभेद आणि  डिजिटल विभाजन दोन्ही गोष्टींना संपवणे आहे. कारण जेव्हा महिला जागृत होतात तेव्हा कुटुंब जागृत होतं, आणि समाज आणि देशाच्या प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. खऱं पाहता विकसित जग त्यालाच म्हणू शकतो जेथे समान व्यवहार असेल.

Published by: Meenal Gangurde
First published: August 12, 2020, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading