Home /News /money /

Reliance Industries चा मोठा करार, मनीष मल्होत्राच्या कंपनीत 40 टक्क्यांची भागीदारी

Reliance Industries चा मोठा करार, मनीष मल्होत्राच्या कंपनीत 40 टक्क्यांची भागीदारी

रिलायन्स परिवारातील रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड (Reliance Brands buys stakes in Manish Malhotra company) या कंपनीनं शुक्रवारी एक मोठा करार केला आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर :  रिलायन्स परिवारातील रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड (Reliance Brands buys stakes in Manish Malhotra company) या कंपनीनं शुक्रवारी एक मोठा करार केला आहे. या कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार (Reliance brands takes 40 percent partnership) रिलायन्स ब्रँड्सनं मनीष मलहोत्राची कंपनी एमएम स्टाईल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 40 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. पहिल्यांदा गुंतवणूक मनीष मलहोत्रा यांच्या ब्रँडमध्ये झालेली ही पहिलीच बाहेरील गुंतवणूक आहे. आतापर्यंत या कंपनीत बाहेरची कुठलीही गुंतवणूक आली नव्हती. मात्र रिलायन्स ब्रँड्सनं हा मोठा निर्णय घेतला असून फॅशनच्या जगात मोठं पाऊल टाकलं आहे. मनिष मलहोत्राचा एमएम  स्टाईल्स हा ब्रँड 2005 साली लॉन्च झाला होता. मनीष मलहोत्राचे चार ब्रँड देशाच्या तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत. मुंबई, दिल्ली आणि हैद्राबादमध्ये या ब्रँड्सचा जोरदार व्यवसाय होतो. शिवाय या ब्रँडचे 1 कोटी 20 लाख ऑनलाईन फॉलोअर्सही आहेत. सिग्नेचर स्टाईल आहे प्रसिद्ध मनीष मलहोत्राचे सिग्नेचर स्टाईल हीच या ब्रँडची सर्वात मोठी ओळख असून त्याच्या जोरावर या ब्रँडने कमी कालावधीत मोठा नावलौकिक मिळवला आहे. गेल्या 14 वर्षात अनेक देशांत या ब्रँडचा बिझनेस असून फॅशन क्षेत्रातील एक मोठं नाव बनलं आहे. हे वाचा - टॅलेंटच्या शोधात आयटी कंपन्या! 1 लाखांपेक्षा अधिक जणांना देणार नोकऱ्या भारतीय कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन या ब्रँडच्या माध्यमातून भारतीय कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा आपला प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया रिलायन्स ब्रँड्स लिमिटेडच्या वतीनं देण्यात आली आहे. मनीष मलहोत्रांनी नेहमीच काळाच्या पुढचा विचार केला आहे. भारतातील कला आणि संस्कृतीचा मोठा इतिहास असून फॅशनच्या माध्यमातून त्याचे जतन करणं, हे आपलं कर्तव्य असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. भारताच्या फॅशन क्षेत्रातील हा एक मोठा करार मानला जात आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Business, Fashion, Reliance

    पुढील बातम्या