RIL आणि BP यांचा संयुक्त उपक्रम; नवा फ्यूएल आणि मोबिलिटी व्यवसाय सुरू

RIL आणि BP यांचा संयुक्त उपक्रम; नवा फ्यूएल आणि मोबिलिटी व्यवसाय सुरू

ब्रिटिश पेट्रोलियम (BP) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) आजपासून संयुक्त विद्यमाने एकत्रित येत रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड या नावाने (RBML)व्यवसाय सुरू केला आहे.

  • Share this:

मुंबई, 9 जुलै : ब्रिटिश पेट्रोलियम (BP) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) आजपासून संयुक्त विद्यमाने एकत्रित येत रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड या नावाने (RBML)व्यवसाय सुरू केला आहे. 2019 मध्ये या दोन कंपन्यांमध्ये यासंदर्भातला प्राथमिक करार झाला होता. आता त्यावर शिक्कामोर्तब झालं आणि RBML ही नवी कंपनी सुरू झाली आहे. Fuel and Mobility Market मधली मोठी कंपनी होण्याचा उद्देश या एकत्रित उद्योगाचा आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये BP आणि RIL च्या टीमने एकत्रित बैठकांमध्ये आव्हानांसंदर्भात चर्चा केली आणि आजपासून त्यांच्या नव्या व्यवसाय पर्वाला सुरुवात झाली आहे.

भारताच्या फ्यूएल आणि मोबिलिटी उद्योगात अग्रस्थानी पोहोचण्याची या RBML संयुक्त उपक्रमाची महत्त्वाकांक्षा आहे, असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. Jio-bp या नावाने हा संयुक्त उपक्रम कार्यरत असेल. भारताचा वाहतूक आणि इंधन क्षेत्रातली मागणी वाढते आहे. पुढच्या 20 वर्षांत भारतातल्या पॅसेंजर कारची संख्या किमान सहा पटीने वाढण्याची शक्यता आहे. या संपूर्ण मागणीला पूरक ठरणारा विस्तार RBML ने योजला आहे. सध्या इंधनविक्रीच्या 1400 रिटेल आउटलेट्स आहेत. त्या जागी पुढच्या पाच वर्षांत 5,500 आउटलेट्स उघडायची योजना आहे.

या संयुक्त उपक्रमात BP कडे 49 टक्के भागिदारी असेल आणि उरलेली 51 टक्के RIL ची असेल. यासाठी BP ने 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. इंधन आणि वाहतूक क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी होण्याची या उद्योगाची महत्त्वाकांक्षा आहे.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 9, 2020, 9:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading