लवकरच लागू होणार घरभाड्याचा कायदा, भाडेकरूंना मिळणार दिलासा

लवकरच लागू होणार घरभाड्याचा कायदा, भाडेकरूंना मिळणार दिलासा

Tenancy Law, Union Budget - लवकरच भाडेकरू आणि घरमालक यांच्यासाठी नवा कायदा लागू होणार आहे. नव्या कायद्यात काय असेल ते घ्या जाणून

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : लवकरच देशात दुकान आणि घर भाड्यानं घेणं आणि देणं सोपं होणार आहे. CNBC आवाजच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाडेकरूंसाठी करण्यात येणाऱ्या कायद्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. मंत्रालयात या विधेयकाला मंजुरी मिळवण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेटच्या भाषणात सांगितलं होतं की, सरकार भाडेकरूंसाठी आदर्श कायदा करणार आहे. सध्याचे कायदे जुने आहेत. ते मालक आणि भाडेकरू यांचे प्रश्न सोडवायला असमर्थ आहेत.

काय आहे नवा कायदा?

नव्या कायद्याप्रमाणे घरमालक 3 महिन्यांपेक्षा जास्त सिक्युरिटी डिपाॅझिट घेऊ शकत नाही.

घर रिकामं करायचं असेल तर 1 महिन्यात सिक्युरिटी डिपाॅझिट परत करावं लागेल.

20व्या वर्षी शंकर कमवतोय वर्षाला 20 कोटी, 'हे' आहे यशाचं रहस्य

घरमालकानं घराचं नूतनीकरण केलं तर भाडं वाढवू शकतो.

घरमालकाला घरी येण्याआधी 1 दिवस नोटिस द्यावी लागेल.

भांडणं, वाद असतील तर कोर्टाऐवजी खास भाडं ट्रायबुनल तयार केली जातील.

महाराष्ट्र वीज वितरण कंपनीत मोठी भरती, 'या' पदांसाठी हवेत उमेदवार

भाडेकरू ते घर दुसऱ्या कुणाला भाड्यानं देऊ शकत नाही.

आता सरकारी कंपन्यांच्या जमिनीवर परडवणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. 2021 पर्यंत 1.95 कोटी घरं बांधण्याचं लक्ष्य असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. शिवाय, या घरांमध्ये गॅस, विज आमि टॉयलेटची व्यवस्था असणार अशी घोषणा देखील निर्मला सीतारामन यांनी केली. 114 दिवसांत आता एक घरं बांधलं जात असल्याची माहिती यावेळी निर्मला सीतारामन यांनी दिली.

... आणि भरत जाधव,अंकुश चौधरीला अश्रू आवरेनात

यापूर्वी देखील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत पहिलं घर घेणाऱ्यांसाठी 2.67 लाखांची सबसिडी सरकारच्या वतीनं देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 2022 पर्यंत सर्वांना हक्काचं घर देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली.

VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा कहर! महादेव मंदिरात गुडघाभर पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2019 12:17 PM IST

ताज्या बातम्या