मराठी बातम्या /बातम्या /मनी /मिरची झाली 'तिखट'; जेवाणाची चव वाढवणाऱ्या मिरचीचे भाव गगनाला, पाहा नवे दर

मिरची झाली 'तिखट'; जेवाणाची चव वाढवणाऱ्या मिरचीचे भाव गगनाला, पाहा नवे दर

दिवाळीनंतर मिरचीची आवक वाढायला सुरुवात होते. मात्र यंदा पावसामुळे अनेक पिकांचं नुकसानच झालं.

दिवाळीनंतर मिरचीची आवक वाढायला सुरुवात होते. मात्र यंदा पावसामुळे अनेक पिकांचं नुकसानच झालं.

दिवाळीनंतर मिरचीची आवक वाढायला सुरुवात होते. मात्र यंदा पावसामुळे अनेक पिकांचं नुकसानच झालं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : CNG आणि PNG चे दर वाढल्यानंतर आता जेवणाची चव वाढवणाऱ्या मिरचीचे दरही वाढले आहेत. लाल मिरचीला सोन्याचा भाव आला आहे. एकीकडे वाढती महागाई आणि दिवसेंदिवस भाज्या आणि जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने गृहिणींचं बजेट कोलमडत आहे. लाल मिरची महाग झाली आहे.

दिवाळीनंतर मिरचीची आवक वाढायला सुरुवात होते. मात्र यंदा पावसामुळे अनेक पिकांचं नुकसानच झालं. दिवाळीनंतर चांगल्या मिरच्या बाजारपेठेत येत असल्याने त्या वर्षभरासाठी घेऊन ठेवाव्यात असा मानस असतो. मात्र यंदा हीच आवक घटल्याने मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत.

वर्षभरासाठी मिरच्या घेताना जरा यावेळी विचार करावा लागणार आहे. कारण बाजारपेठेत मागणी तेवढीच आहे मात्र आवक घटल्याने आता किंमती वाढल्या आहेत. लाल मिरचीच्या क्विटलमागे 26 हजार ते एक लाख रुपये मोजावे लागत आहेत. यावेळी मिरचीचे भाव दुप्पट वाढले आहेत.

Nashik : टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल, उत्पादन खर्च निघणेही अवघड, VIDEO

साधारण नवा हंगाम मार्च ते मे तीन महिन्यांचा असतो. त्यामध्ये सर्वात जास्त मिरची ही महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये होते. यंदा पाऊस लांबल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अति पावसामुळे मिरच्यांचं उत्पादन कमी झालं.

बेगडी मिरचीसाठी तर 47 हजारांहून अधिक रुपये क्विंटलमागे मोजावे लागत आहेत. दोन महिन्यांपूर्वी हेच मिरचीचे दर ३० हजार रुपयांवर होते. आता तेच 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

अनेक गृहिणी ह्या घरीच लाल तिखट तयार करतात, सुक्या मिरचीचा वापर भाज्यांसाठी किंवा इतर मसाल्यांसाठी केला जातो. आता मिरचीच्या किंमती वाढल्याने लाल तिखटाची किंमतही वाढणार का हे पाहावं लागणार आहे.

आधीच अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठ नुकसान झालं. डोळ्या देखत पीक वाहून गेली. हे सार झालं असताना कसबस शेतकरी उरलेली पीक सावरतोय तर आता टोमॅटोचे दर कोसळले आहेत. 10 ते 15 दिवसांपूर्वी 800 ते 900 रुपये टोमॅटोच्या कॅरेटचे दर होते.

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा टोमॅटो आता चांगल्या प्रमाणात बाजारात येऊ लागला आहे तर आता अगदी 150 ते 200 रुपये कॅरेटवर दर आले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च तरी निघेल की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

First published:

Tags: Karnataka, Maharashtra News, Nashik