मराठी बातम्या /बातम्या /मनी /FAQ RD: रिकरिंग डिपॉझिटवरील व्याजाबाबत सातत्यानं विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे, वाचा सविस्तर

FAQ RD: रिकरिंग डिपॉझिटवरील व्याजाबाबत सातत्यानं विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे, वाचा सविस्तर

आरडी हा उत्तम पर्याय समजला जातो. या माध्यमातून तुम्ही 6 महिने ते 10 वर्षापर्यंत कालावधीकरिता बचत करू शकता. मात्र `आरडी`च्या (RD) व्याज दराबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात.

आरडी हा उत्तम पर्याय समजला जातो. या माध्यमातून तुम्ही 6 महिने ते 10 वर्षापर्यंत कालावधीकरिता बचत करू शकता. मात्र `आरडी`च्या (RD) व्याज दराबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात.

आरडी हा उत्तम पर्याय समजला जातो. या माध्यमातून तुम्ही 6 महिने ते 10 वर्षापर्यंत कालावधीकरिता बचत करू शकता. मात्र `आरडी`च्या (RD) व्याज दराबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात.

मुंबई, 30 नोव्हेंबर : गुंतवणूक किंवा बचत (Saving) ही काळाची गरज बनली आहे. पूर्वी बहुतांश लोकांचा बचतीचा मूळ उदेदश हा केवळ सेवानिवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, असा असायचा. मात्र आता स्थिती बदलली आहे. अगदी कमी वयापासूनच बचत किंवा गुंतवणूकीला (Investment) प्राधान्य दिलं जात आहे. अर्थात बदलत्या गरजा, आर्थिक परिस्थिती आदी बाबी त्यासाठी कारणीभूत मानता येतील. काही लोक बचतीकडं उत्पन्नाचं साधन म्हणूनही पाहत आहेत. रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) किंवा फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) या पर्यायांचा वापर करणाऱ्यांची संख्या आता लक्षणीय आहे.

सुरक्षित गुंतवणूक किंवा बचतीला बहुतांश लोक प्राधान्य देत असल्याचं चित्र आहे. बचत करताना व्याज दर (Interest Rate) किती मिळणार असा प्रश्न प्रत्येकजण विचारताना दिसतो. कोणत्याही स्वरुपाच्या बचतीसाठी हा घटक महत्त्वाचा असतो, कारण संबंधित व्यक्तीचं आर्थिक नियोजन हे व्याज दरावर अवलंबून असतं.

खासगी, सहकारी तसेच शासकीय बॅंका, वित्तीय संस्था आणि पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी सुविधा उपलब्ध करून देतात. बचतीची सवय आणि आर्थिक शिस्त लागण्यासाठी आरडी हा उत्तम पर्याय समजला जातो. या माध्यमातून तुम्ही 6 महिने ते 10 वर्षापर्यंत कालावधीकरिता बचत करू शकता. मात्र `आरडी`च्या (RD) व्याज दराबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यातील काही सातत्यानं विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण सविस्तरपणे जाणून घेऊया...

Multibagger Stock : 8.86 रुपयांचा शेअर 886 रुपयांवर; 1 लाख बनले 1 कोटी

गुंतवणूक किंवा बचतीसाठी सर्वांत सुरक्षित आणि लवचिक पर्याय म्हणून आवर्ती ठेव म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट या पर्यायकडं पाहिलं जातं. सेव्हिंग अकाउंटच्या तुलनेत आरडीवर अधिक व्याज दर दिला जातो. त्यामुळे आरडी अधिक फायदेशीर ठरते. मात्र आरडीतून मिळणाऱ्या व्याजाच्या अनुषंगानं लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात.

प्रश्न – `आरडी`वर किती व्याज दर मिळू शकतो?

उत्तर – व्याज दर हे वेळोवेळी बदलत असतात. त्यामुळे आरडी अकाउंट सुरु करतेवेळी संबंधित बॅंकांच्या शाखेत किंवा वेबसाईटवर याबाबतची माहिती तुम्ही घेऊ शकता.

प्रश्न – आरडी अकाउंटमध्ये व्याज (Interest) कधी जमा केलं जातं?

उत्तर – संबंधित बचत तारखेपासून 31 मार्चपर्यंत प्रत्येक हप्त्याच्या रकमेवर व्याजाची गणना केली जाते. व्याज हे 31 मार्चपर्यंत एक वर्ष पूर्ण होत असेल तर नाहीतर मॅच्युरिटी तारखेपर्यंत जमा झालेल्या मुद्दलावर (नेट टीडीएस लागू असल्यास) मोजलं जातं.

उद्या 1 डिसेंबरपासून होणार 'हे' पाच बदल; काय होतील परिणाम?

प्रश्न – आरडीचं व्याज तिमाही, सहामाही कालावधीत दिलं जातं का?

उत्तर – नाही. `आरडी`वर दिलं जाणारं व्याज आणि मुद्दल ही मॅच्युरिटीनंतर संबंधित व्यक्तीच्या खात्यावर जमा होते.

प्रश्न - ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) रिकरिंग डिपॉझिटवर अधिक व्याज मिळतं का?

उत्तर – होय. जर तुम्ही भारतीय ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला आरडीवर 0.5 टक्के व्याज दर अधिक मिळतो. तसंच अन्य फायदेदेखील संबंधित बॅंक किंवा वित्तीय संस्थेकडून दिले जातात.

प्रश्न – आरडीसाठी नामांकन (Nominee) किंवा लाभार्थी ( Beneficiary ) सुविधा उपलब्ध असते का?

उत्तर – होय. रिकरिंग डिपॉझिट अकाउंट सुरू करताना तुम्ही तुमच्या कुटुंबातील किंवा नात्यातील व्यक्तीचं नाव नॉमिनी म्हणून देऊ शकता. जर तुम्हाला काही झालं तर मुदतीपूर्वी या खात्यातून पैसे काढण्याचा अधिकार नॉमिनी व्यक्तीला मिळतो. त्याचप्रमाणे नॉमिनी किंवा लाभार्थी व्यक्तीचं नाव बदलण्याचा अधिकार देखील तुम्हाला दिला जातो.

प्रश्न – आरडीची रक्कम मॅच्युरिटी तारखेला थेट संबंधित व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा केली जाते का?

उत्तर – होय, मॅच्युरिटी तारखेला तुमची आरडी खात्यातील रक्कम बॅंक खात्यात थेट जमा होते. मात्र जर बॅंक खात्यात रक्कम जमा झाली नाही तर तुम्ही तातडीने संबंधित बॅंकेच्या ग्राहक सुविधा कक्षाशी संपर्क साधू शकता.

प्रश्न – रिकरिंग डिपॉझिटवर टीडीएस (TDS) लागू आहे का?

उत्तर – होय, वित्त विधेयक 2015 नुसार, 1 जून 2015 पासून लागू होणाऱ्या आर्थिक वर्षात रिकरिंग डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस लागू आहे.

एक बाटली आणि चौघांचा बळी; सुसाट कारने 100 फूट हवेत उडवलं, थरारक घटनेचा VIDEO

प्रश्न- रिकरिंग डिपॉझिट अकाउंट सुरु करण्यासाठी किमान डिपॉझिट रक्कम किती असते?

उत्तर – रिकरिंग डिपॉझिट अकाउंट सुरु करतेवेळी तुम्हाला 500 रुपये किमान डिपॉझिट रक्कम भरावी लागते.

प्रश्न – रिकरिंग डिपॉझिट अकाउंट सुरू केल्यानंतर ते 7 दिवसांच्या आत बंद केल्यास किती शुल्क आकारले जाते?

उत्तर – अकाउंट सुरु केल्यानंतर 7 दिवसांत ते बंद केल्यास बचतीवर कोणतंही व्याज दिलं जात नाही. तसेच मुदतीपूर्वी अकाउंट बंद करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही.

प्रश्न – बचत करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती आरडी कॅलक्युलेटरचा (RD Calculator) वापर करू शकते का?

उत्तर – होय. आता जवळपास सर्वच बॅंकांच्या अधिकृत वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध आहे. आरडी कॅलक्युलेटरच्या मदतीनं तुम्ही इच्छित रकमेवर कालावधीनुसार मॅच्युरिटीवेळी किती रक्कम मिळेल याचा अंदाज घेऊ शकता.

प्रश्न – किती कालावधीकरिता आरडी अकाउंट सुरू करता येते?

उत्तर – आरडीमध्ये कोणीही व्यक्ती अल्प, मध्यम किंवा दीर्घ मुदतीकरिता बचत करू शकते. सर्वसाधारणपणे 6 महिने ते 10 वर्षापर्यंत बचतीचा पर्याय या माध्यमातून अनेक बॅंका देतात.

प्रश्न- इंटरनेट बॅंकिंग (Internet Banking) सुविधेच्या माध्यमातून आरडी अकाउंट सुरु करता येतं का?

उत्तर – होय. तुमच्याकडे इंटरनेट बॅंकिंगसाठीचा युझर नेम आणि पासवर्ड असेल, आणि जर तुम्ही या सुविधेच्या माध्यमातून एखादा तरी व्यवहार केला असेल तर तुम्ही या याव्दारे आरडी अकाउंट सुरू करू शकता.

First published:
top videos

    Tags: Investment, Money