Home /News /money /

IDBI बँकेत स्पेशल ऑफिसर पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

IDBI बँकेत स्पेशल ऑफिसर पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील महत्वाच्या तारखा, पदांची संख्या आणि इतर माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या

    नवी दिल्ली, 5 जानेवारी : आयडीबीआय बँकेत (IDBI Bank) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. आयडीबीआय बँकेच्या एकूण 134 रिक्त जागांसाठी ही भरती होत असून यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज दाखल करु शकतात. 7 जानेवारी 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून त्याआधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील महत्वाच्या तारखा, पदांची संख्या आणि इतर माहितीसाठी आयडीबीआय बँकेच्या idbibank.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड D), असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड C), मॅनेजर (ग्रेड B), असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. महत्वाच्या तारखा (Important Dates) ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात - 24 डिसेंबर 2020 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 जानेवारी 2021 ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख - 07 जानेवारी 2021 कुठल्या पदाच्या किती जागांसाठी भरती ?  डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड D ) 11 जागांसाठी भरती असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड C) 52 जागांसाठी भरती मॅनेजर (ग्रेड B) 62  जागांसाठी भरती असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) 9  जागांसाठी भरती निवड प्रक्रिया (Recruitment Process) एकूण 134 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत असून या पदांसाठी शैक्षणिक योग्यता आणि अनुभव पहिला जाईल. त्यानंतर ग्रुप डिस्कशन किंवा वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवाराला बोलावले जाईल. प्रवेश फी  (Application Process) यासाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 700 रुपये शुल्क आहे. तर  एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवाराला 150 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अन्य महत्वाच्या सूचना (Other Details) 1) या भरती प्रक्रियेत एक उमेदवार केवळ एका पदासाठीच अर्ज करु शकतो. 2) फी ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी जमा करण्यात आल्यानंतरच अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल. 3) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आपली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर गोष्टींची खात्री करून अर्ज करावा. 4) भारतातील कुठल्याही शाखेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्याने आपला अर्ज सादर करावा. त्याचबरोबर यासाठी केवळ बँकेच्या  idbibank.in या अधिकृत वेबसाईटवरच विश्वास ठेवावा.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या