Home /News /money /

Edible Oil: खाद्यतेल आणखी स्वस्त, सर्वसामान्यांना दिलासा; 10-15 रुपयांनी दर घसरले

Edible Oil: खाद्यतेल आणखी स्वस्त, सर्वसामान्यांना दिलासा; 10-15 रुपयांनी दर घसरले

Edible Oil: जून महिन्याच्या सुरुवातीपासून देशभरातील कॅनबंद खाद्यतेलाच्या सरासरी किरकोळ किमती खाली आल्या आहेत. सध्या देशात शेंगदाणा तेल वगळता खाद्यतेलाचे दर 150 ते 190 रुपये किलोवर आहेत.

    मुंबई, 24 जून : खाद्यतेलाबाबत (Edible Oil) मोठा बातमी समोर येत आहे. बाजारात सध्या खाद्यतेलाच्या अनेक बड्या कंपन्यांनी तेलाच्या किमती कमी केल्या आहेत. अदानी विल्मर (Adani Wilmar) ते पतंजली ब्रँडच्या (Patanjali) खाद्यतेलाच्या किमती 10 ते 15 रुपयांनी घसरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दरात घट झाल्यामुळे सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्याने खाद्यतेलाच्या किमती खाली आल्याचे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. जून महिन्याच्या सुरुवातीपासून देशभरातील कॅनबंद खाद्यतेलाच्या सरासरी किरकोळ किमती खाली आल्या आहेत. सध्या देशात शेंगदाणा तेल वगळता खाद्यतेलाचे दर 150 ते 190 रुपये किलोवर आहेत. PPF खात्यातून मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढता येतात, किती होईल नुकसान? चेक करा प्रोसेस सरकारी आकडेवारीनुसार दरात असा बदल झाला अन्न मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशातील प्रमुख खाद्यतेलाच्या ब्रँड्सनी टप्प्याटप्प्याने किमती कमी केल्या आहेत. सध्या तेलाचे दर प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांनी खाली आले आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 1 जून रोजी शेंगदाणा पॅक केलेल्या तेलाची किंमत 186.43 रुपये प्रति किलो होती, त्याच किंमती 21 जून रोजी 188.14 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आल्या. मोहरीच्या तेलाचा भाव 1 जून रोजी 183.68 रुपये प्रति किलो होता, तर 21 जून रोजी हाच भाव 180.85 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला. सोया तेलाचे भाव 169.65 रुपयांवरून 167.67 रुपयांवर घसरले, तर सूर्यफूल तेल 193 रुपयांवरून 189.99 रुपयांवर घसरले. पाम तेलाचा भाव 1 जूनला 156.52 रुपयांवरून 21 जूनला 152.52 रुपयांवर आला आहे. Post Office मध्ये अकाऊंट असेल तर उभारता येतील 20 लाख, कशी कराल गुंतवणूक? आयात शुल्कात कपातीचा परिणाम खाद्यतेल स्वस्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे आयात शुल्कात झालेली घट आहे. भारत आपल्या खाद्यतेलाच्या गरजेच्या 50 टक्के आयात करतो. ज्यामध्ये 60 टक्के पाम तेल 40 टक्के सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आयात केले जाते. आयात शुल्कात कपात केल्यामुळे खाद्यतेल कंपन्यांच्या खर्चात कपात झाली आहे. यामुळे खाद्यतेल कंपन्यांनी ग्राहकांना दरात सवलत देण्यास सुरुवात केली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Food, Money

    पुढील बातम्या