मराठी बातम्या /बातम्या /मनी /रियल इस्टेट शेअर्समध्ये वर्षभरात 40-100 टक्के वाढ, पुढे कशी असेल या क्षेत्रातील चाल?

रियल इस्टेट शेअर्समध्ये वर्षभरात 40-100 टक्के वाढ, पुढे कशी असेल या क्षेत्रातील चाल?

बीएसई रिअल इस्टेटमध्ये गेल्या 3 महिन्यांत 9 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर 2021 मध्ये रियल्टी निर्देशांक (Realty Index) 60 टक्क्यांहून अधिक वाढला आहे, तर सेन्सेक्समध्ये या वर्षात आतापर्यंत केवळ 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मुंबई, 12 डिसेंबर : रिअल इस्टेट क्षेत्रासाठी (Real Estate Sector) हे वर्ष उत्तम ठरले आहे. यापूर्वी 2020 मध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचं कोरोनामुळे खूप (Corona virus) नुकसान झाले होते. परंतु या वर्षी झालेल्या रिकव्हरीने सर्व चिंता दूर केल्या आणि त्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्र नवीन उंचीला स्पर्श करताना दिसत आहे.

बीएसई रिअल इस्टेटमध्ये गेल्या 3 महिन्यांत 9 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर 2021 मध्ये रियल्टी निर्देशांक (Realty Index) 60 टक्क्यांहून अधिक वाढला आहे, तर सेन्सेक्समध्ये या वर्षात आतापर्यंत केवळ 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.

चॉईस ब्रोकिंगचे अंकित पारीक म्हणतात की, रिअल इस्टेट क्षेत्रातील भरभराटीचे बहुतांश श्रेय सरकारने परवडणाऱ्या घरांच्या उपलब्धतेसाठी केलेल्या उपाययोजनांना जाते, ज्यात कमी कर दर, कर सूट, प्रथम PMAY अंतर्गत प्रथम घर घेणाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि स्टॅम्प ड्युटीमधील कपात या सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे Godrej Properties, Sobha Developers, Pheonix Mills, DLF, Prestige Estates, Oberoi Realty यांसारख्या शेअर्समध्ये यावर्षी आतापर्यंत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा ई-नॉमिनेशनची प्रक्रिया, अन्यथा...

रिअल इस्टेट क्षेत्रातील ही तेजी 10 वर्षांनंतर दिसली आहे. आता एवढ्या तेजीनंतर या क्षेत्रातील गुंतवणूकदारांची रणनीती काय असावी, हा प्रश्न आहे. यावर Piper Serica चे अभय अग्रवाल सांगतात की, आमच्या बाजार विश्लेषणावरून असे दिसून येते की, रिअल इस्टेट क्षेत्रात यापुढील काळात मागणी मजबूत राहील आणि इन्व्हेंटरी कमी झाल्याने किमतीतही वाढ होईल. दरम्यान, गेल्या 5 वर्षात उद्योग वेगाने मजबूत होत आहे आणि मोठ्या गुंतवणूकदारांचा बाजार हिस्सा वाढत आहे.

PNB ग्राहकांसाठी ALERT! सावध नाही राहिल्यास तुमच्या कष्टाच्या पैशांवर फिरेल पाणी, अकाउंट रिकामं होण्याची भीती

शेअरखानचे रोनाल्ड सियोनी म्हणतात की, कोविड-19 दरम्यान बड्या रिअल इस्टेट कंपन्यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. रोनाल्ड सिओनी यांचा असा विश्वास आहे की रिअल इस्टेट क्षेत्र स्ट्रक्चरल ट्रेंडमधून जात आहे. परवडणाऱ्या घरांसाठी सरकार सातत्याने प्रोत्साहन देत आहे. यासाठी रेरा, मुद्रांक शुल्कात कपात, व्याजदरात सवलत अशा अनेक सुविधा दिल्या जात आहेत. याव्यतिरिक्त, REITs द्वारे व्यावसायिक पोर्टफोलिओच्या मुद्रीकरणामुळे इक्विटी भांडवलात वाढ झाली आहे, ज्यामुळे व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये वाढीसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. हे सर्व पाहता, रोनाल्ड सिओनी, महिंद्रा लाइफस्पेस आणि ओबेरॉय रियल्टी यांसारखे शेअर तेजीत आहेत तर त्यांना गोदरेज प्रॉपर्टीजपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

चॉईस ब्रोकिंगच्या अंकित पारीक यांच्या लाँग टर्म टॉप पिक्समध्ये DLF आणि Oberoi Realty यांचा समावेश आहे. तसेच ते संपूर्ण रिअल सेक्टरवर बुलिश दृष्टीकोन ठेवतात.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market