• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • कर्जदारांना मोदी सरकारने दिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टात व्याजाबाबत दिली महत्त्वाची माहिती

कर्जदारांना मोदी सरकारने दिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टात व्याजाबाबत दिली महत्त्वाची माहिती

केंद्र सरकारने कर्जदारांना मोठा दिलासा देण्याची घोषणा केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : केंद्र सरकारने कर्जदारांना मोठा दिलासा देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत त्यात, एमएसएमई MSME लोन, एज्युकेशन, हाउसिंग, कंज्यूमर, ऑटो, क्रेडिड कार्ड थकबाकी आणि चालू कर्जावर चक्रवाढ व्याज अर्थात व्याजावर लावलं जाणारं व्याज माफ करण्याबाबत, सांगितलं आहे. 6 महिन्यांच्या लोन मोरेटोरियम काळात Loan Moratorium दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील अतिरिक्त व्याजावर सवलत देण्यात येईल. कोरोनाच्या काळात व्याजाच्या सवलतीचा भार सरकारने घ्यावा, असं सांगितलं असून केंद्र सरकारने योग्य अनुदानासाठी संसदेकडून परवानगीही मागितली आहे. हे वाचा - फेसबुकमुळे तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होतो परिणाम; धक्कादायक माहिती उघड या निर्णयाचा सामान्यांवर काय परिणाम होणार कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटापासून ते जुलैपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. लॉकडाउनमुळे उद्योगधंदे बंद होते. अशा परिस्थितीत अनेक लोकं EMI भरु शकत नसल्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे RBIने EMI न भरण्याबाबत सूट दिली. परंतु मोठी समस्या कर्जावर लागणाऱ्या अतिरिक्त चार्जबाबत होती. हा अतिरिक्त चार्ज कर्जदारांवर, लोक घेतलेल्या ग्राहकांवर मोठं ओझं ठरतं होता. त्यामुळे आता केंद्र सरकारने कर्जाच्या व्याजावरील अतिरिक्त चार्जमध्ये सवलत दिल्याने कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. आता ग्राहकांना केवळ कर्जावरील सामान्य व्याज द्यावं लागणार आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: