मुंबई, 23 डिसेंबर: नवीन वर्षाचं कॅलेंडर (Calender) घरी आलं की सगळेजण आधी सुट्ट्या बघतात. एखादी सुट्टी बुडली असेल तर फारच वाईट वाटतं. कुठल्या सुट्टीत कुठे जायचं याचं नियोजनही होतं. रोजच्या चक्रातून विरंगुळा देणारी सुट्टी म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आताही सगळ्यांना नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. भारतात नवीन वर्षातील सरकारी सुट्ट्यांची (Government Holidays) माहिती टपाल खात्याच्या (Post Office) कॅलेंडरमधून मिळते. तसेच बँकांना असणाऱ्या सुट्ट्या शाळांना, सरकारी कार्यालयांना असतात. अर्थात खासगी क्षेत्रात या सर्व सुट्ट्या नसतात, पण काही सुट्ट्या सर्व क्षेत्रात सारख्या असतात. त्यामुळे टपाल आणि बँकांना असलेल्या सुट्ट्यांवरून आताच पुढच्या वर्षी कोणत्या आणि किती सुट्ट्या आहेत, याचा अंदाज घेऊन तुम्ही सुट्टीतील बेत ठरवू शकता. 1688 मध्ये वॉरेन हेस्टिंग्ज यांनी भारतात टपाल सेवेचा पाया रोवला. लॉर्ड डलहौसी यांनी 1854 मध्ये इंडिया पोस्ट ऑफिस अॅक्ट तयार करून या सेवेचा विस्तार केला. आज भारतात टपाल खात्याचं जाळं गावागावात पसरलं आहे. अनेक सेवा देणारं हे खातं नागरिकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक झालं आहे. रिपब्लिक वर्ल्ड डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार, टपाल खात्याला नवीन वर्षात पुढील सुट्ट्या आहेत.
प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी - मंगळवार
गुड फ्रायडे – 2 एप्रिल -शुक्रवार
महावीर जयंती – 25 एप्रिल -रविवार
ईद उल फित्र – 14 मे – शुक्रवार
बुद्ध पौर्णिमा – 26 मे - बुधवार
ईद उल झुहा (बकरी ईद)- 26 मे - बुधवार
स्वातंत्र्यदिन -15 ऑगस्ट - रविवार
मुहर्रम – 19 ऑगस्ट- गुरुवार
म. गांधी जयंती – 2 ऑक्टोबर -शनिवार
दसरा- 15 ऑक्टोबर -शुक्रवार
मोहम्मद पैगंबर जयंती (ईद ए मिलाद)- 19 ऑक्टोबर - मंगळवार
दिवाळी - 4 नोव्हेंबर - गुरुवार
गुरु नानक जयंती – 19 नोव्हेंबर - शुक्रवार
ख्रिसमस -25 डिसेंबर – शनिवार
2021मध्ये महाराष्ट्रात असलेल्या बँकेच्या सुट्ट्या
प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी - मंगळवार
शिवजयंती – 19 फेब्रुवारी – शुक्रवार
महाशिवरात्री – 11 मार्च – गुरुवार
होळी- 29 मार्च- सोमवार
गुड फ्रायडे – 2 एप्रिल -शुक्रवार
गुढीपाडवा – 13 एप्रिल - मंगळवार
डॉ. आंबेडकर जयंती – 14 एप्रिल - बुधवार
रामनवमी – 21 एप्रिल - बुधवार
महावीर जयंती – 25 एप्रिल - रविवार
महाराष्ट्र दिन – 1 मे – शनिवार
रमादान (रमजान) – 11 मे – मंगळवार
बुद्ध पौर्णिमा