मुंबई : ऑक्टोबर महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 0.50 बेसिस पॉईंटने रेपो रेट वाढवला होता. आता पुन्हा एकदा तीन महिन्यांनी रेपो रेट वाढवणार असल्याची माहिती मिळत आहे. सतत वाढत असलेल्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली.
रेपो रेट वाढल्याने झपाट्याने कर्जाच्या व्याजदरातही वाढ झाली आहे. त्यामुळे नवे कर्ज घेणाऱ्या किंवा EMI भरणाऱ्या लोकांवर अधिक भार आला आहे. या काळात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 1.90 टक्के वाढ करण्यात आली आहे. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक सोमवारपासून सुरू होत आहे. 7 डिसेंबरला चलनविषयक धोरण जाहीर करण्यात येईल.
'या' कारणामुळे लोकांना वाटतेय रिटायरमेंटनंतरची चिंता; सर्व्हेमध्ये झाला चकित करणारा खुलासा
5 डिसेंबरला होणार महत्त्वाची बैठक
व्याजदर अधिक वाढले तर त्याचा परिणाम इकोनॉमिक रिवाइवलवर होऊ शकतो, असे उद्योग संघटनेचं म्हणणं आहे. आरबीआय गव्हर्नरच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय एमपीसीची सोमवारी बैठक होणार आहे. 7 डिसेंबर (बुधवार) रोजी पतधोरण जाहीर करण्यात येणार आहे. 'रेपो रेटमध्ये 0.25 ते 0.35 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करू नये,' असे 'असोचेम'ने आरबीआयला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ऑक्टोबर महिन्यात US फेड बँक आणि त्यासोबत इतर जागतिक बँकांनी व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर RBI ने देखील रेपो रेटमध्ये वाढ केली. 0.50 टक्क्यांनी ही वाढ करण्यात आली होती. आता जर पुन्हा व्याजदर वाढलं तर मात्र लोन आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
RBI च्या निर्णयामुळे गृह आणि कार कर्जाचा EMI किती वाढेल? समजून घ्या गणित
या वर्षात मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केलेली ही चौथी वाढ होती. याआधी ऑगस्टमध्ये रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली होती आणि व्याजदर 4.90 टक्क्यांवरून 5.40 टक्के करण्यात आलं होतं. आता पुन्हा व्याजदरात किती वाढ होणार याची धाकधूक लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instant loans, Loan, Rbi, Rbi latest news