• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • खुशखबर, ATM मधून पैसे काढण्यासाठी कुठलीही बँक लावू शकणार नाहीत हे चार्जेस

खुशखबर, ATM मधून पैसे काढण्यासाठी कुठलीही बँक लावू शकणार नाहीत हे चार्जेस

RBI नं एटीएम ट्रान्झॅक्शन चार्जेससंबंधी मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिलेत.

 • Share this:
  मुंबई, 06 जून : RBI नं एटीएम ट्रान्झॅक्शन चार्जेससंबंधी मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिलेत. केंद्रीय बँकेनं बैठकीत एक समिती नेमण्याचा निर्णय घेतलाय. या समितीद्वारे ATM दरांबद्दल विचार केला जातोय. या समितीचं नेतृत्व IBAचे CEO करतील. ही समिती दोन महिन्यात आपली शिफारस RBI ला देईल. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं, एटीएमचा वापर वाढतोय. एटीएमसंबंधी फी आणि चार्जेसबद्दल बराच काळ चर्चा सुरू आहे. अनेकदा हे दर रद्द करण्याची मागणी केली गेलीय. गव्हर्नर दास म्हणाले की यासाठीच RBI समिती स्थापन करतेय. या वर्षाच्या सर्वात मोठ्या घसरणीनं शेअर बाजार बंद RBI ची मोठी घोषणा, ग्राहकांना आता द्यावे नाही लागणार बँकेचे 'हे' दर या समितीचं नेतृत्व इंडियन बँक असोसिएशन IBAचे CEO करतील. ही समिती या दरांचं समीक्षण करून आपला अहवाल RBIला देईल. ही समिती दोन महिन्यात आपली शिफारस RBI ला देईल. RBI एका आठवड्यात या समितीच्या अटी प्रसिद्ध करेल. 10 वीच्या निकालानंतर गोंधळून जाऊ नका, असं निवडा तुमचं करिअर BI नं आपलं तिमाही धोरण जाहीर केलंय. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियानं रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलीय. त्यामुळे रेपो रेट 6.0 टक्क्यांवरून आता 5.75 टक्क्यांवर आलाय. त्यामुळे आता कर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता आहे. रेपो रेट म्हणजे काय? दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात. VIDEO : पवार फक्त बारामतीचे नेते, प्रकाश आंबेडकरांचा टोला
  First published: