सावधान! तुम्हीही हे अ‍ॅप वापरता? बँक खाते होईल रिकामे

भारतीय रिझर्व बँकेने ही अॅप न वापरण्याचा सल्ला दिला आहे.

  • Share this:

डिजीटल व्यवहारांमुळे आपला बँकांच्या रांगेत थांबण्याचा वेळ वाचला आणि कमीत कमी वेळात ज्याचे पैसे द्यायचे आहेत त्याला थेट पैसे पाठवता येऊ लागले. पण यातही फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. आजकाल अनेक अॅप्स प्लेस्टोअरवर आहेत. यातील काही अॅप वापरणे धोकादायक ठरू शकते.

जर तुम्ही  Anydesk अॅप वापरत असाल तर सावध व्हा. भारतीय रिझर्व बँकेने प्रसिद्ध केलेल्या यादीत हे अॅप न वापरण्याचा सल्ला दिला आहे. हे अॅप हॅकर्सना आपल्या खात्याची सर्व माहिती पुरवते. यामुळे खात्यातील रक्कम त्रयस्त व्यक्ती तुम्हाला न विचारता काढू शकते.

एनीडेस्क हे अॅप तुम्ही इन्स्टॉल करावे यासाठी खोटा कॉल केला जातो. तसेच बँकेतून बोलत असल्याचे सांगत अॅप डाऊनलोड करण्यास सांगतात. त्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबरसह इतर माहिती विचारली जाते. तसेच कार्ड ब्लॉक होईल अशी भितीदेखील घातली जाते.

अॅप इन्स्टॉल केल्यानंतर इतर अॅपप्रमाणे परवानगी मागितली जाते. त्यानंतर मोबाईलवर हॅकर्स ताबा घेतात. यासाठी हॅकर्स 9 अंकी व्हेरिफिकेशन कोडही मागतात.

व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर हॅकर त्यांना हवे तेव्हा आणि हवे तसे तुमच्या मोबाईलचा वापर करू शकतात. यामध्ये इन्स्टॉल केलेली अॅप्सही वापरली जातात. आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणारा UPI नंबरही ते मिळवू शकतात. त्याआधारे खात्यावरील रक्कम काढता येते.

हॅकर्सकडून होणाऱ्या अशा प्रकारच्या फसवणूकीतून वाचण्यासाठी खोट्या कॉलपासून सावध राहण्याची गरज आहे. तुमच्याकडे कोणी पासवर्डची, खाते क्रमांकाची मागणी केल्यास तो देऊ नका. तसेच अॅपने जनरेट केलेला कोड शेअर करू नये असंही आरबीआयने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 10:19 AM IST

ताज्या बातम्या