RBI चलनात आणणार 10 रुपयांची नवी नोट, काय असेल खासीयत?

RBI चलनात आणणार 10 रुपयांची नवी नोट, काय असेल खासीयत?

20 रुपयांची नवी नोट चलनात आलीय, आता 10 रुपयांचीही नवी नोट RBI आणतेय.

  • Share this:

मुंबई, 21 मे : रिझर्व्ह बँक लवकरच 10 रुपयांची नवी नोट आणतेय. 10 रुपयांची ही नवी नोट  महात्मा गांधी ( नव्या ) सीरिजप्रमाणेच असेल. 10 रुपयांच्या या नोटेवर RBIचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असेल. RBIनं ट्विट करून ही माहिती दिलीय. शिवाय 10 रुपयांच्या जुन्या नोटाही चालतील.

सत्ता मोदींचीच, पण शेअर बाजाराला येणार नाहीत 'अच्छे दिन'

200 आणि 500 रुपयांची नवी नोट

एप्रिलमध्ये RBIनं महात्मा गांधी न्यू सीरिजमध्ये गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या सहीसह 200 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटांची घोषणा केली होती. त्याच वेळी RBIनं 20 रुपयांच्या नव्या नोटेचीही घोषणा केली होती. जुन्या नोटाही चालतील, असं सांगितलं होतं.

Zomato ची खास ऑफर, पंतप्रधानांचं नाव सांगा आणि...

काही दिवसांपूर्वी 20 रुपयांची हिरवट पिवळ्या रंगाची नवी कोरी नोट लवकरच चलनात येणार असल्याची माहिती अधिकृतपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं  जाहीर केली होती. ही नव्या नोटांची सीरिज लवकरच बँकांमध्ये उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं.

नरेंद्र मोदींमुळे मुंबईचा सट्टा बाजार बंद; जाणून घ्या कारण

अनेक दिवसांपासून २० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याबाबत चर्चा सुरू होत्या मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नुकतीच 20 रुपयांची नवी नोट चलनात येणार असल्याची माहिती दिली आहे.

या नव्या चलनावर भारतीय संस्कृतीची ओळख पटवून देणाऱ्या अॅलोरा गुहेचं प्रतिक छापण्यात आलं आहे. आतापर्यंत आलेल्या प्रत्येक नव्या चलनामागे भारतीय संस्कृतीचा इतिहास सांगणाऱ्या वास्तूंचं प्रतिक छापण्यात आलं आहे. या माध्यमातून भारतातील ऐतिहासिक वस्तूंचा गौरव करण्याचा हेतू असल्याचं सांगितलं आहे.

VIDEO: उद्धव ठाकरेंची प्रताप सरनाईकांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी

First published: May 21, 2019, 3:00 PM IST

ताज्या बातम्या