Home /News /money /

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 75000 कोटी रुपयांसाठी ओव्हरनाईट VRR चा लिलाव करणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 75000 कोटी रुपयांसाठी ओव्हरनाईट VRR चा लिलाव करणार

रिझर्व्ह बँकेने माहिती दिली आहे की सप्टेंबर 2021 मध्ये देशभरातील डिजिटल पेमेंटमध्ये वार्षिक 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. RBI ने जारी केलेल्या डिजिटल पेमेंट डेटानुसार, डिजिटल पेमेंट इंडेक्स सप्टेंबर 2021 मध्ये वार्षिक आधारावर लक्षणीय वाढला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 24 जानेवारी : रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी म्हणजे आज सांगितले की लिक्विडिटी अॅडजस्टमेंट फॅसिलिटी (LAF) अंतर्गत 75,000 रुपयांच्या रकमेसाठी ओव्हरनाईट व्हेरिएबल रेपो रेट (VRR) लिलाव आयोजित करेल. रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, रिव्हर्सल करण्याची तारीख 25 जानेवारी 2022 आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, आरबीआयने 20 जानेवारी रोजी 50,000 कोटी रुपयांचा ओव्हरनाइट व्हेरिएबल रेट रेपो लिलाव आयोजित केला होता. अर्थव्यवस्थेच्या उत्पादक क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी लिक्विडीटी राखून ठेवत रोख रकमेचे संतुलन राखणे सुरू ठेवणार असल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 17.5 लाख कोटींचं नुकसान दरम्यान, रिझर्व्ह बँकेने माहिती दिली आहे की सप्टेंबर 2021 मध्ये देशभरातील डिजिटल पेमेंटमध्ये वार्षिक 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. RBI ने जारी केलेल्या डिजिटल पेमेंट डेटानुसार, डिजिटल पेमेंट इंडेक्स सप्टेंबर 2021 मध्ये वार्षिक आधारावर लक्षणीय वाढला आहे. यानुसार, RBI-DPI सप्टेंबर 2021 मध्ये 304.04 वर होता, तर मार्च 2021 मध्ये 270.59 आणि सप्टेंबर 2020 मध्ये 217.74 होता. आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, डीपीआय निर्देशांक दाखवतो की देशभरात डिजिटल पेमेंटमध्ये वेगाने वाढ होत आहे. Paytm, Zomato शेअर्समध्ये मोठी घसरण, लिस्टिंगनंतरच्या नीच्चांकी पातळीवर, काय आहे कारण? RBI ने डिजिटल पेमेंट इंडेक्स लाँच करताना मार्च 2018 हे बेस वर्ष म्हणून घोषित केले होते. मार्च 2021 पासून, RBI हा निर्देशांक चार महिन्यांच्या अंतराने सहामाही आधारावर जारी करत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Rbi

    पुढील बातम्या