खात्यातून गेले पण ATM मधून नाही आले पैसे, तर तुम्हाला बँक देईल भुर्दंड

खात्यातून गेले पण ATM मधून नाही आले पैसे, तर तुम्हाला बँक देईल भुर्दंड

RBI, Bank - आरबीआयनं ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : भारतीय रिझर्व्ह बँकेनं टर्नअराउंड टाइम (TAT) संदर्भात नवा आदेश दिलाय. RBI नं बँकांना सांगितलं की ट्रॅन्झॅक्शन फेल झालं तर वेळेतच ग्राहकांना ते पैसे मिळाले पाहिजेत. ट्रॅन्झॅक्शन फेलसंबंधी अनेक तक्रारी पाहिल्यानंतर बँकेनं लवकरात लवकर मार्ग काढावा असं सांगितलंय.

RBI नं सांगितलं की आर्थिक नुकसान भरपाई बँकांना करावी लागेल. त्यासाठी ग्राहकांच्या तक्रारीची वाट पाहता कामा नये.

खूशखबर! 1 ऑक्टोबरपासून 'या' गोष्टी होणार स्वस्त

याआधी एप्रिल महिन्यात केंद्रीय बँकेनं टर्नअराउंड टाइमसंदर्भात पावलं उचलली आहेत. RBI कडे बऱ्याच ग्राहकांच्या तक्रारी आल्या. म्हणून हे आदेश दिले गेलेत.

1 दिवसात परत मिळतील पैसे

RBI नं 8 प्रकारच्या आर्थिक व्यवहाराबद्दल नवे नियम लागू केलेत. यात एटीएममधून देवाणघेवाण, लगेच पैसे परत, युनिफाइड पेमेंट सिस्टिम आणि प्रीपेड कार्डस् सिस्टिम यांचा समावेश आहे.या माध्यमांमध्ये ट्रॅन्झॅक्शन फेल झालं तर एका दिवसात गेलेले पैसे परत मिळतील.

सरकारच्या या स्कीममध्ये 200 रुपये गुंतवून मिळवा 35 लाख रुपये

जर ग्राहकाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर 100 रुपये दंड आहे. आरबीआयनं सांगितलं की ग्राहकांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून हे पाऊल उचललंय.

सगळेच जण ATM द्वारे पैसे काढतात. जास्त प्रमाणात ATMचा वापर केला जातोय, तसा फ्राॅडही वाढतोय. तुम्ही थोडी काळजी घेतली नाही तर तुमचं बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. डेबिट कार्डाचं क्लोनिंग होऊ शकतं. कार्ड क्लोनिंग म्हणजे तुमच्या पूर्ण माहितीची चोरी करून तसंच दुसरं कार्ड बनवलं जातं. तुम्ही काही टिप्स लक्षात घेऊन सुरक्षित ट्रॅन्झॅक्शन करू शकता.

पेट्रोल आणि डिझेल झालं पुन्हा महाग, 'हे' आहेत आजचे दर

तुमच्या डेबिट कार्डाचा पूर्ण अॅक्सेस घेण्यासाठी हॅकर्सकडे तुमचा पिन नंबर असणं आवश्यक आहे. हॅकर्स पिन नंबरला कॅमेऱ्यातून ट्रॅक करू शकतात. म्हणून जेव्हा तुम्ही ATM मध्ये पिन नंबर टाकता तेव्हा तो दुसऱ्या हातानं लपवा. म्हणजे CCTV मध्ये तो दिसणार नाही.

जेव्हा तुम्ही ATM मध्ये जाता तेव्हा एटीएम मशीनच्या कार्ड स्लाॅटकडे लक्ष द्या. तो सैल आहे का, त्यात काही फरक जाणवतोय का, ते नीट पाहा.

तुम्ही हॅकरच्या जाळ्यात अडकलात आणि बँकाही बंद असताल, तर ताबडतोब तुम्ही पोलिसांशी संपर्क साधा. कारण पोलिसांना तिथे हॅकरच्या बोटांचे ठसे सापडतील. शिवाय तुमच्या जवळ ब्लुटूथ कनेक्शन चालू आहे का ते पाहा. त्याद्वारे  तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोचू शकाल.

VIDEO : युतीचं फायनल झालं की नाही? चंद्रकांत पाटील म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ATM
First Published: Sep 22, 2019 07:22 AM IST

ताज्या बातम्या