मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँकेच्या वसुली एजंट्सना लगाम लावण्यासाठी RBI चे कडक नियम, एजंट्स कोणत्या वेळेत फोन करु शकतात?

बँकेच्या वसुली एजंट्सना लगाम लावण्यासाठी RBI चे कडक नियम, एजंट्स कोणत्या वेळेत फोन करु शकतात?

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की कंपन्यांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की त्यांचे वसुली एजंट कोणत्याही कर्जदाराला त्रास देणार नाहीत. वसुलीसाठी कॉलची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 14 ऑगस्ट : बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर काही कारणास्तव EMI थकल्यास बँकेकडून एजंट्स वसूलीसाठी फोन करतात. मात्र अनेकांना असेही अनुभव आले होते की हे वसुली एजंट ग्राहकांना अत्यंत खालच्या स्तरावर संवाद साधतात. अनेक तक्रारी याबाबत समोर आल्या होत्या. म्हणूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटलं की, फायनान्स कंपन्यांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की त्यांचे वसुली एजंट कोणत्याही कर्जदाराला त्रास देणार नाहीत. वसुलीसाठी फोन करण्याची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने एका परिपत्रकात म्हटलं आहे की, असे आढळून आले आहे की वसुली एजंट वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगवर नियंत्रण ठेवणाऱ्या विद्यमान सूचनांचं पालन करत नसल्याचे समोर आले आहे. कोणत्याही व्यक्तीचा शाब्दिक किंवा शारिरीक छळ करू नये अनेकदा वसुली एजंट वेळकाळ न बघता कर्जदाराला फोन करुन पैशांची विचारणा करतात. पैशांची मागणी करताना त्यांची भाषा अत्यंत त्रासदायक असल्याचा अनुभव अनेक ग्राहकांना सांगितलं आहे. अनेकदा हे वसुली एजंट कर्जदाराच्या कुटुंबियांना देखील त्रास देताना आढळलं आहे. याशिवाय रेफरन्ससाठी दिलेल्या जवळच्या लोकांना देखील हे वसुली एजंट त्रास देतात असं निदर्शनात आले आहे. कर्जदारांच्या कुटुंबातील सदस्यांना सार्वजनिकरित्या अपमानित करणे किंवा घुसखोरी करणे, रेफरी मित्र, मोबाईलवर किंवा सोशल मीडियाद्वारे अयोग्य संदेश पाठवणे, धमकी देणे किंवा निनावी कॉल करणे, कर्जदाराला सतत कॉल करणे किंवा थकित कर्जासाठी विचारणे, संध्याकाळी 7 नंतर कर्जदाराला कॉल करू नका, अशा सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत. परिपत्रकानुसार, वसुलीसाठी चुकीच्या वाढत्या घटनांसह काही अलीकडील घडामोडी लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्गदर्शक तत्त्वांची व्याप्ती वाढवून वसुली एजंट्ससाठी अतिरिक्त सूचना जारी केल्या आहेत.
First published:

Tags: Bank details, Rbi

पुढील बातम्या