RBI ने केली २० रुपयांच्या नवीन नोटांची घोषणा, जाणून घ्या वैशिष्ट्य

रिझर्व्ह बँकेने (RBI) २० रुपयांच्या नवीन नोटेची घोषणा केली आहे. या नवीन नोटमध्ये अनेक अतिरिक्त सुरक्षा देण्यात आल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2018 03:01 PM IST

RBI ने केली २० रुपयांच्या नवीन नोटांची घोषणा, जाणून घ्या वैशिष्ट्य

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) २० रुपयांच्या नवीन नोटेची घोषणा केली आहे. या नवीन नोटमध्ये अनेक अतिरिक्त सुरक्षा देण्यात आल्या आहेत. नोटबंदीनंतर केंद्रीय बँकेने आतापर्यंत १०, ५०, १००, २००, ५०० आणि २ हजार रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणल्या. या सर्व नोटा महात्मा गांधींच्या सीरिजमध्येच जारी करण्यात आल्या होत्या. आता २० रुपयांची ही नवी नोट कशी असणार आहे त्याबद्दल जाणून घेऊ...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २० रुपयांच्या नवीन नोटेवरही ऐतिहासिक इमारतीचा फोटो लावण्यात येऊ शकतो. ही इमारत महाराष्ट्रातील अजंठा गुंफा असू शकते. अजंठा गुंफेला युनेस्को मान्यता मिळाली आहे. २० रुपयांची ही नवी नोट जुन्या नोटेपेक्षा २० टक्क्यांनी लहान असेल.

नवीन आणि अतिरिक्त सुरक्षेसह ही नोट बाजारात आणली जाणार आहे. आरबीआयने २० रुपयांची नवी नोट जारी करण्याबाबत अधिकृत घोषणा केली. २० रुपयांची ही नोट नोटबंदीनंतर जारी केलेली सातवी नोट आहे.

Loading...

आतापर्यंत नवीन नोटांच्या रंगांबद्दल आरबीआयने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, नवीन नोटा या गडद लाल रंगाच्या असतील. या नोटाही महात्मा गांधी सीरिजमधीलच असतील.

या नोटांचं डिझाइन आणि आकार पहिल्या नोटांपेक्षा वेगळं असेल. आरबीआयने सांगितल्याप्रमाणे मार्च २०१८ पर्यंत देशात २० रुपयांचे १० कोटी नोट प्रचलनात होत्या, जे मार्च २०१६ च्या ४.९२ कोटींच्या तुलनेत दुपटीने जास्त आहेत. आरबीआयच्या मते, मार्च २०१८ पर्यंत एकुण नोटांमध्ये २० रुपयांच्या नोटांची भागीदारी ही ९.८ टक्के होती.

रिझर्व्ह बँकेने काही महिन्यांपूर्वी १०० रुपयांची नवी नोट जारी केली होती. आरबीआयने जुलैमध्ये ही नोट जारी करण्याची घोषणा केली होती. १०० रुपयांच्या नवीन नोटेवर स्वच्छ भारत अभियानाच्या लोकांना नारा देतानाचा फोटो छापलेला आहे. या नोटेचा रंग बदलतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 03:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...