मराठी बातम्या /बातम्या /मनी /दोन नोटांचा सीरियल नंबर एकच असेल तर काय करायचं? RBI म्हणतं...

दोन नोटांचा सीरियल नंबर एकच असेल तर काय करायचं? RBI म्हणतं...

तुम्ही पैशांचा व्यवहार करत असताना तुम्हाला अचानक एकाच सीरियलच्या दोन नोटा मिळाल्या तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?

तुम्ही पैशांचा व्यवहार करत असताना तुम्हाला अचानक एकाच सीरियलच्या दोन नोटा मिळाल्या तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?

तुम्ही पैशांचा व्यवहार करत असताना तुम्हाला अचानक एकाच सीरियलच्या दोन नोटा मिळाल्या तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई: आपण आर्थिक व्यवहारांसाठी पैशांचा वापर करतो. त्यासाठी आपण रिझर्व्ह बँकेने तयार आणि प्रमाणित केलेल्या चलनाचा वापर करतो. पण तुम्ही पैशांचा व्यवहार करत असताना तुम्हाला अचानक एकाच सीरियलच्या दोन नोटा मिळाल्या तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

    अनेक वेळा ही नोट खोटी असल्याचीही शंका येते. जर तुम्हाला नोट खरी की खोटी ते ओळखायचं असेल, तर तुम्ही ते सहज करू शकता. कारण भारतीय रिझर्व्ह बँक खऱ्या आणि बनावट नोटांमधील फरक ओळखण्यासंबंधी माहिती देत असते. जिच्या मदतीने तुम्ही खऱ्या आणि बनावट नोटा सहज ओळखू शकाल.

    समजा तुमच्याकडे 500 रुपयांच्या दोन नोटा आहेत आणि दोन्हीचा सीरियल नंबर एकच आहे. अशा स्थितीत ती नोट बनावट मानली जाईल की वैध? याबाबत रिझर्व्ह बँक काय म्हणते ते जाणून घेऊया.

    तुम्हाला नोटेवर लिहिण्याची सवय, मग RBI चा हा नियम माहिती आहे का?

    देशात चलन जारी करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. कायद्याच्या कलम 22 नुसार, रिझर्व्ह बँकेला भारतात नोटा जारी करण्याचा अधिकार आहे. कलम 25 स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की नोटांचं डिझाईन, स्वरुप आणि साहित्य केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या शिफारशींचा विचार करून तयार केलं जातं.

    आता जर दोन नोटांचा सीरियल नंबर एकच असेल तर त्या वैध मानल्या जातील का? या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते की दोन किंवा अधिक बँकांच्या नोटांचा सीरियल नंबर एकच असण्याची शक्यता आहे. परंतु, तो एकतर वेगळ्या इनसेट लेटरसह किंवा प्रिंटिंगच्या वेगळ्या वर्षासह किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेगळ्या गव्हर्नरच्या स्वाक्षरीसह असू शकतो. इनसेट लेटर म्हणजे नोटेच्या नंबर पॅनलवर छापलेलं अक्षर. नोटा कोणत्याही इनसेट लेटरशिवायदेखील असू शकतात.

    तुमची बँक सुरक्षित आहे की नाही? RBI चे गव्हर्नर काय म्हणाले पाहा

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑगस्ट 2006 पर्यंत जारी केलेल्या बँक नोटांना क्रमांक देत असे. यातील प्रत्येक बँकेच्या नोटांना क्रमांक किंवा अक्षराने सुरू होणारा एक अनोखा सीरियल नंबर दिला जायचा. या बँकेतील नोटा 100 नगांच्या पॅकेटच्या स्वरूपात जारी केल्या जायच्या. समजा एखादी नोट वापरण्यासारख्या स्थितीत नसेल तर तुम्ही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन ती बदलू शकता.

    प्राप्तकर्त्या बँका अशा नोटा त्यांच्याकडे ठेवतात आणि त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठवतात जिथे त्या नष्ट केल्या जातात. चलनातून काढून घेतलेल्या बँक नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इश्यू ऑफिसमध्ये स्वीकारल्या जातात. रिझव्‍‌र्ह बँक, इतर गोष्टींबरोबरच, या बँक नोटांची पडताळणी करते आणि सर्व प्रकारच्या चाचण्यांनंतर त्यात फिट न बसणाऱ्या नोटा वेगळ्या करून त्यांना नष्ट करण्याच्या श्रेणीत टाकते.

    First published:

    Tags: Money, Rbi, Rbi latest news