मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'सकाळी 8 च्या आधी फोन कराल तर...', RBI कडून कर्जवसुली एजंट्सना कडक इशारा

'सकाळी 8 च्या आधी फोन कराल तर...', RBI कडून कर्जवसुली एजंट्सना कडक इशारा

बँकेकडून किंवा एखाद्या वित्त संस्थेकडून कर्ज (Loan) घेतलं असेल, तर वेळीअवेळी रिकव्हरी एजंट्सचे (Recovery Agents) फोन येतात.  कर्जवसुली करणाऱ्या एजंट्ससाठी RBI ने एक अधिसूचना जारी केली आहे.

बँकेकडून किंवा एखाद्या वित्त संस्थेकडून कर्ज (Loan) घेतलं असेल, तर वेळीअवेळी रिकव्हरी एजंट्सचे (Recovery Agents) फोन येतात. कर्जवसुली करणाऱ्या एजंट्ससाठी RBI ने एक अधिसूचना जारी केली आहे.

बँकेकडून किंवा एखाद्या वित्त संस्थेकडून कर्ज (Loan) घेतलं असेल, तर वेळीअवेळी रिकव्हरी एजंट्सचे (Recovery Agents) फोन येतात. कर्जवसुली करणाऱ्या एजंट्ससाठी RBI ने एक अधिसूचना जारी केली आहे.

मुंबई : बँकेकडून किंवा एखाद्या वित्त संस्थेकडून कर्ज (Loan) घेतलं असेल, तर वेळीअवेळी रिकव्हरी एजंट्सचे (Recovery Agents) फोन येतात. त्यामुळे कर्जदार अगदी वैतागून जातात; पण आता कर्जदारांना दिलासा वाटेल अशी एक महत्त्वाची घोषणा RBI ने शुक्रवारी (12 ऑगस्ट) केली आहे. कर्जवसुली करणाऱ्या एजंट्ससाठी RBI ने एक अधिसूचना जारी केली आहे. यानुसार आता कर्जवसुली करणारे एजंट्स रिकव्हरीसाठी कर्जदारांना सकाळी 8च्या आधी आणि संध्याकाळी 7नंतर फोन करू शकणार नाहीत. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बँका, गैरबँकिंग वित्त कंपन्या (NBFC), कर्जपुरवठा करणाऱ्या वित्त कंपन्या, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या (ARC) आदींसाठी ही अधिसूचना आहे. कर्जवसुलीसंदर्भातील नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची सूचना यामध्ये देण्यात आली आहे. ‘बँका त्यांच्या किंवा त्यांच्या एजंटमार्फत करण्यात येणाऱ्या कर्जवसुलीदरम्यान कर्जदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही किंवा त्यांचा छळ होणार नाही अशा प्रकारच्या नियमांचं काटेकोपरपणे पालन करण्याकडे लक्ष देतील,’ असं RBI ने म्हटलं आहे. RBI ने कर्जदारांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. कर्जदारांना कोणत्याही प्रकारचा अनुचित किंवा धमकी देणारा संदेश पाठवणं किंवा अज्ञात नंबरवरून फोन करण्यासही RBI ने बंदी घातली आहे. वसुली एजंट्स कर्जदारांना सकाळी आठच्या आधी आणि संध्याकाळी सातनंतर फोन करू शकत नाहीत, अशी सक्त ताकीद RBI च्या वतीने देण्यात आली आहे. वित्त संस्था कर्जदारांना त्रास देऊ शकत नाहीत किंवा त्यांचा छळ करू शकत नाहीत, असं RBI च्या वतीने याआधीही स्पष्ट करण्यात आलं होतं. तरीही सध्या अनेक वसुली एजंट्स कर्जवसुलीसाठी कर्जदारांना त्रास देत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे RBI नं पुन्हा नव्याने हे आदेश दिले आहेत. सर्व व्यावसायिक बँका, सहकारी बँका, NBFC, ARC आणि अखिल भारतीय वित्त संस्थांसाठी हा आदेश लागू असेल असं RBI नं स्पष्ट केलं आहे. रिझर्व्ह बँकेकडे (RBI) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या संदर्भात तक्रारी येत होत्या. कर्ज वसुलीसाठी एजंट्सकडून छळवणूक केली जात असल्याच्या तक्रारींच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. कोविडमुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काही जणांच्या नोकऱ्या, रोजगार गेला आहे. त्यामुळे कर्जाची वेळेवर परतफेड करण्यात अनेक जण अपयशी ठरले आहेत. त्यानंतर पैसे वसूल करण्यासाठी वसुली एजंट अशा प्रकारचा दबाव टाकत आहेत; पण यामुळे सर्वसामान्य नागरिकांची स्थिती आणखीच बिकट झाली आहे. ही सर्व परिस्थिती पाहता RBI ने हे निर्देश दिले आहेत. रिकव्हरी एजंट्सनी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचा इशारा त्यात देण्यात आला आहे.
First published:

Tags: Rbi

पुढील बातम्या