PMC बँकेनंतर RBI ने आणखी एका बँकेवर घातली बंदी, काढता येणार इतकी रक्कम

PMC बँकेनंतर RBI ने आणखी एका बँकेवर घातली बंदी, काढता येणार इतकी रक्कम

पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणखी एका बँकेतून रक्कम काढण्यावर निर्बंध घातले आहेत.

  • Share this:

बेगंळुरू, 14 जानेवारी : पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणखी एका बँकेतून रक्कम काढण्यावर निर्बंध घातले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरूतील श्री गुरु राघवेंद्र सहकारी बँकेच्या व्यवहारांमधील अनियमिततेमुळे त्यांच्यावर बंदी घातली आहे. आता या बँकेच्या ग्राहकांना फक्त 35 हजार रुपयेच काढता येणार आहेत.

श्री गुरु राघवेंद्र सहकारी बँकेच्या ग्राहकांना आरबीआयच्या नव्या आदेशामुळे कोणत्याही प्रकारचं नवीन कर्ज मिळणार नाही. तसेच ग्राहकांना खात्यातून 35 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. पुढच्या सहा महिन्यांमध्ये बँकेत कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही. आरबीआयने बँकेचा परवाना रद्द करण्याबाबत काही स्पष्ट केलेले नाही. मात्र, बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 च्या कलम 35 अंतर्गत केली आहे.

भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी ट्विट करून म्हटलं की, सहकारी बँकेच्या ग्राहकांनी शांत रहावं. ग्राहकांनी काळजी करू नये. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याशी याबद्दल चर्चा केली आहे. त्यांनी ग्राहकांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असं आश्वासन दिलं आहे. त्यासाठी त्यांचे आभार.

बेंगळुरुत असलेल्या श्री गुरु राघवेंद्र सहकारी बँकेचे 9 हजार ग्राहक आहेत. रिझर्व्ह बँकेने याबाबत एक पत्र संकेतस्थळावर अपलोड केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, 10 जानेवारी 2020 ला व्यवहार बंद झाल्यानंतर बँकेतून कोणतंही कर्ज किंवा अनुदान देता येणार नाही. प्रत्येक बचत तसेच चालू खात्यातील रक्कम काढण्यासाठी 35 हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे.

वाचा : तुमच्या SBI खात्यात ही माहिती अपडेट करा नाहीतर पैसे काढणं होणार कठीण

बँकेचे चेअरमन रामाकृष्णा यांनीही सर्व ग्राहकांना आश्वासन दिलं आहे. सर्व ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत. श्री गुरु राघवेंद्र सहकारी बँकेत ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा : आर्थिक मंदीचा फटका, यावर्षी कमी होणार 16 लाख नोकऱ्या

Published by: Suraj Yadav
First published: January 14, 2020, 11:58 AM IST
Tags: rbi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading