मराठी बातम्या /बातम्या /मनी /

BREAKING: महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द, ठेवीदार-सभासदांमध्ये गोंधळ

BREAKING: महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द, ठेवीदार-सभासदांमध्ये गोंधळ

बँकिंग क्षेत्रात खळबळ माजवणारी आणखी एक घटना समोर येते आहे. सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध कराड जनता सहकारी बँकेचा (Karad Janata Sahakari Bank) बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) रद्द केला आहे.

सातारा, 08 डिसेंबर: बँकिंग क्षेत्रात खळबळ माजवणारी आणखी एक घटना समोर येते आहे. सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध कराड जनता सहकारी बँकेचा (Karad Janata Sahakari Bank) बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) रद्द केला आहे. RBI ने जारी केलेले आदेश आजच प्राप्त झाले आहेत. त्यानंतर सभासद आणि ठेवीदारांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान सहकार आयुक्तांनी बँक अवसायनत (Liquidation) मध्ये गेल्याचं जाहीर केलं केले आहे. परवाना रद्द झाल्यानंतर त्यांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर केली आहे. अवसायनिक म्हणून उपनिबंधक मनोहर माळी यांची या बँकेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

कराड जनता सहकारी बँकेचे सातारा, सांगली, कोल्हापूर,  पुणे,  मुंबई याठिकाणी असणाऱ्या एकूण 29 शाखांमध्ये 32 हजार सभासद आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे या सर्व सभासदांना आणि ठेवीदारांना मोठा झटका बसला आहे. या बँकेच्या संचालकांवर 310 कोटी अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

(हे वाचा-रेल्वेने बदलला तिकिट बुकिंगचा नियम, कोट्यवधी प्रवाशांवर होणार थेट परिणाम)

2017 मध्ये कराड शहर पोलिसात जनता बँकेच्या संचालक मंडळासह काही अधिकाऱ्यांवर 310 कोटींच्या अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानंतर 6 ऑगस्ट 2019 रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधांनंतर कराड जनता सहकारी बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. बँकेबाबत अनेक आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्यानंतर आज रिझर्व्ह बँकेने ही बँकिंग परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे.

(हे वाचा-कमाईसाठी 'हे' 10 व्यवसाय आहेत बेस्ट, महिन्याला मिळतील लाखो रुपये)

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार बँकेतील ठेवीदारांचे 5 लाखांपर्यंतचे पैसे परत करण्यात येणार आहे. मात्र या प्रक्रियेला आणली तीन महिन्याचा कालावधी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादरम्यान बँकेच्या विस्तारित कक्षांसह एकूण 29 शाखांमधील कामकाज या काळात बंद राहणार आहे. 2017 ते 2019 या काळात बँकेकडून करण्यात आलेली काम नियमबाह्य असल्याचा आरोप केला जात आहे.

First published:

Tags: Money, Rbi