खाते उघडण्याच्या नियमात RBI कडून बदल, वाचा कोणत्या ग्राहकांना मिळेल फायदा

खाते उघडण्याच्या नियमात RBI कडून बदल, वाचा कोणत्या ग्राहकांना मिळेल फायदा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने चालू खात्याच्या काही नियम शिथील करण्याची घोषणा केली आहे. नवीन नियम आजपासून लागू होत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 डिसेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of   India) ने चालू खात्याच्या काही नियमात शिथिलता आणण्याची घोषणा केली आहे. हे नवे नियम आजपासून लागू करण्यात आले आहेत. नवीन नियमांच्या मते 6 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेकडन कमर्शिअल बँका आणि पेमेंट बँक्ससाठी एक  सर्क्यूलर जारी केले होते, ज्यामध्ये चालू खात्यासंदर्भात काही निर्देश जारी करण्यात आले होते. मात्र आता या नियमांअंतर्गत काही खात्यांना दिलासा दिला आहे.

6 ऑगस्टला आरबीआयने एक सर्क्यूलर जारी केले होते. ज्यामध्ये अशी माहिती देण्यात आली होती की आरबीआयने अनेक ग्राहकांवर चालू खाते उघडण्यावर निर्बंध आणले होते. ज्या ग्राहकांना बँकिंग सिस्टिममध्ये कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट स्वरुपात क्रेडिट फॅसिलिटी घेतली आहे.

नवीन सर्क्यूलरमध्ये काय बदल?

नवीन सर्क्यूलरनुसार ग्राहकांना त्याच बँकेत Current Account किंवा ओव्हरड्राफ्ट अकाउंट उघडणं अनिवार्य असेल, ज्या बँकेतून ते लोन घेत आहेत.

का जारी केला हा नियम?

ज्या ग्राहकांनी बँकेकडून 50 कोटींपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे अशा ग्राहकांनाच हा नियम लागू होईल. रिझर्व्ह बँकेने असे म्हटले आहे की ग्राहक अनेकदा एका बँकेतून कर्ज घेतात आणि दुसर्‍या बँकेत जाऊन करंट खाते उघडतात असं निदर्शनास आले आहे. असे केल्याने कंपनीच्या कॅशफ्लोचा मागोवा घेण्यात बरीच अडचण येते. म्हणूनच आरबीआयने एक परिपत्रक जारी करुन असे म्हटले आहे की, कोणतीही बँक अशाप्रकारच्या ग्राहकांचे चालू खाते उघडणार नाही, ज्यांनी कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा इतर बँकेतून घेतली आहे.

बँकांनीही या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत

चालू खाते उघडण्याच्या अटींमध्ये सवलत देण्याबरोबरच आरबीआयनेही ग्राहकांना सतर्क केले आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की ही सूट केवळ अटींसह दिली जात आहे, त्यामुळे बँकांनीही याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय, काही विशिष्ट व्यवहारासाठीच याचा वापर केला जाईल, अशी  खात्री बँकांनी देणे गरजेचे आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 15, 2020, 4:57 PM IST

ताज्या बातम्या