मोदींच्या कार्यकाळात RBI नं केले मोठे बदल, आता वाचतील तुमचे पैसे

मोदींच्या कार्यकाळात RBI नं केले मोठे बदल, आता वाचतील तुमचे पैसे

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या बँक आॅफ इंडिया ( RBI )च्या पहिल्या बैठकीचे रिझल्ट बाहेर आले.

  • Share this:

मुंबई, 07 जून : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या बँक आॅफ इंडिया ( RBI )च्या पहिल्या बैठकीचे रिझल्ट बाहेर आले. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियानं रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलीय. त्यामुळे रेपो रेट 6.0 टक्क्यांवरून आता 5.75 टक्क्यांवर आलाय. दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेचा फायदा होणार. पैसे वाचणार.

30 लाखाच्या गृहकर्जावर दर महिन्याला 474 रुपयांची बचत - तुम्ही 30 लाख रुपये गृहकर्ज घेतलं असेल तर त्याचा अवधी 20 वर्षांचा आहे. आताच्या दराप्रमाणे 8.60 टक्क्यांच्या हिशेबानं तुमचं EMI 26,225 रुपये आहे. आता 0.25 टक्के रेपो रेट कमी झाल्यानं नवं व्याज 8.35 असेल. आता तुमचा EMI 25, 751 रुपये आहे. म्हणजे तुमची बचत 474 रुपये झाली.

पोस्टात पैसे गुंतवायचेत? 'या' आहेत फायदेशीर योजना

SSC RESULT 2019 : 10वीचा निकालाची तारीख अखेर जाहीर maharesult.nic.in इथे उद्या पाहा Result

20 लाख रुपयाच्या गृहकर्जावर 316 रुपयांची बचत : तुम्ही 20 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलंत. तुमचा अवधी 20 वर्षांचा आहे. आताच्या 8.60 टक्के हिशेबानं तुमचा EMI 17,483 रुपये आहे. आता झालेल्या कपातीमुळे नवं व्याज दर 8.35 आहे. आता नवा EMI 17,167 रुपये आहे. दर महिन्याला तुम्ही 316 रुपये बचत करू शकाल.

10वी उत्तीर्ण असलेले घेऊ शकतात गॅस एजन्सी, 'हे' आहेत नियम आणि अटी

RTGS आणि NEFT चार्जेस रद्द : आरबीआयनं  RTGS आणि NEFT वर बँकाकडून आकारण्यात येणारे दर रद्द केलेत. RBI बँकांकडून हे दर घेत होती, पण आता ते घेणार नाही. त्यामुळे ग्राहकांना फक्त बँक जे दर आकारेल तेच द्यावे लागतील.  म्हणजे RTGS आणि NEFT स्वस्त होतील.

RTGS (Real-time gross settlement) हे लाखो रुपये ट्रान्सफर करायचं उत्तम माध्यम आहे. या माध्यमात काही सेकंदात पैसे ट्रान्सफर होतात. याउलट एनईएफटी (National electronic funds transfer ) ठराविक वेळीच पैसे ट्रान्सफर होतात.

VIDEO : आघाडीत राहणार की नाही? राजू शेट्टींचा नवा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: modirbi
First Published: Jun 7, 2019 05:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading