नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर SBI ने होमलोन स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. SBI दिवाळीच्या आधीच ग्राहकांना भेट देणार आहे. तज्ज्ञांच्या मते, RBI ने रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होमलोनवर 7. 95 टक्के व्याजदर लागेल.
SBI होमलोन, कारलोन आणि इतर कर्जांवरचा व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते. रेपो रेटवर आधारित कर्ज योजना ठरवणारी SBI ही पहिली बँक आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्याचा फायदा SBI च्या होमलोन धारकांना मिळू शकतो.
असा होईल बदल
जर तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं होमलोन घेतलं असेल तर 7.95 टक्के दराने व्याज लागेल. या हिशोबाने तुमचा EMI 25 हजार रुपये होईल. यामध्ये तुमचे 468 रुपये वाचतील. दर महिन्याला होमलोनच्या हप्त्यामध्ये एवढे पैसे वाचणार आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे सगळ्याच बँकांचं कर्ज स्वस्त होईल. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात दिवाळीच्या निमित्ताने रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना चांगली भेट दिली आहे.
(हेही वाचा : PMC सारखी बँक गोत्यात आली तर खातेदारांच्या पैशाचं काय होतं?)
यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये GDP च्या वाढीचा दर 5 टक्क्यांवर आला होता. हा दर गेल्या 6 वर्षातला सर्वात नीचांकी दर होता. RBI ने सलग चौथ्यांदा व्याजदरात घट केली आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
रोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात.
===============================================================================
VIDEO: ठाण्यात गॅस पाईपलाईन फुटल्यानं उंच फवारे, परिसरातील गॅस पुरवठा बंद
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा