मुंबई, 5 ऑगस्ट: अलीकडच्या काळात महागाई प्रमाणापेक्षा जास्त वाढली आहे. महागाईमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं (RBI) आज व्याजदरात वाढ केली आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये (Repo rate) 50 बेसिस पॉईंटची वाढ केली, त्यामुळे तो 4.90 टक्क्यांवरून 5.40 टक्के झाला आहे. यापूर्वी, रेपो दरात जूनमध्ये 50 बेसिस पॉइंट्स आणि मेमध्ये 40 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली होती. सध्या रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात वाढ केल्यामुळं तुमच्या गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या ईएमआयमध्येही वाढ होणार आहे. व्याजदर वाढवल्यानंतर बँका त्यांची कर्जे महाग करतील, हे मे महिन्यात दिसून आलं होतं.
रेपो रेट म्हणजे काय?
RBI बँकांना ज्या दरानं कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर. या वाढीव दरानंतर बँकांना रिझव्र्ह बँकेकडून महागडी कर्जे मिळतील. त्यामुळं ही कर्ज ग्राहकांनाही महाग होतील.म्हणजेच आगामी काळात गृहकर्ज आणि वाहन कर्ज महागणार आहे.
EMI Calculation-
जर तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं असेल. SBI चे गृहकर्जावरील कर्जाचे दर पाहता, SBI चा सध्या गृहकर्जावर 7.05 टक्के व्याजदर आहे. पण आता बँकांनीही त्यात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली तर ते 7.55 टक्के होईल.
1. गृहकर्जावर सध्याचा EMI-
कर्ज – व्याज – कार्यकाळ – EMI – एकूण व्याज
30 लाख – 7.55% – 20 वर्षे – 24260 रुपये – 28,22,304 रुपये
दर वाढीनंतर EMI-
कर्ज – व्याज – कार्यकाळ – EMI – एकूण व्याज
3० लाख – 8.055% – 20 वर्षे – 25187 रुपये – 3,044,793 रुपये
म्हणजेच, तुमच्या 20 वर्षांसाठी 30 लाखांच्या गृहकर्जावर दरमहा EMI मध्ये 927 रुपयांची वाढ होईल. तुमचं एकूण व्याज देखील सुमारे 222489 लाख रुपयांनी वाढेल.)
हेही वाचा- Bima Yojana: दरमहा फक्त 1 रुपये जमा करा, सरकार देईल 2 लाख रुपयांचा लाभ
2. वाहन कर्ज (Auto Loan)-
समजा तुम्ही 5 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे वाहन कर्ज घेतले आहे. एसबीआयचे वाहन कर्जावरील सध्याचे व्याजदर पाहता, ते सध्या वार्षिक 8.30 टक्के आहेत. पण जर यातही 50 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली तर ते 8.80 टक्क्यांपर्यंत खाली येईल.
सध्याचा EMI-
कर्ज – व्याज – कार्यकाळ – EMI – एकूण व्याज
10 लाख – 8.30% – 60 महिने – 20,420 रुपये – 2,25,216 रुपये
दर वाढीनंतर EMI
कर्ज – व्याज – कार्यकाळ – EMI – एकूण व्याज
10 लाख – 8.30% – 60 महिने – 20,661 रुपये – 2,39,685 रुपये
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.